इरफान खान सोशल मीडियावर अॅक्टिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2017 11:50 IST
नकारात्मक भूमिका करणाऱ्या पैकी एक अशी ओळख असलेले इरफान खान नेहमीच सोशल मीडिया पासून दूर राहिला आहे तो कधीच ...
इरफान खान सोशल मीडियावर अॅक्टिव्ह
नकारात्मक भूमिका करणाऱ्या पैकी एक अशी ओळख असलेले इरफान खान नेहमीच सोशल मीडिया पासून दूर राहिला आहे तो कधीच इतर कालाकाराप्रमाणे आपले वैयक्तिक जीवनातील घडामोडी सोशल मीडियावर शेअर करत नाही पण आता मात्र त्यांने इन्स्टाग्राम एक सोशल मीडियावर तो आपल्या वेगळ्या शैलीत दिसणार आहेत जय वीरू सारखे हुबेहूब पोशाख परिधान करून इरफान खान ना आपला फोटो इन्स्टाग्राम शेअर केले आहेत. तसेच अजून अशाप्रकारचे वेगवेगळे अंदाज दाखवून त्यांनी रसिकांची उत्कंठा वाढवली आहे. हे इरफान खानचे बालपणीचे फोटो असल्याचे कळते आहे. या फोटो इरफान घोडेस्वारी करताना दिसतोय. इरफानला कुणीतरी सांगितले होते की अभिनेता बनण्यासाठी तुला घोडेस्वारी करता येणे गरजेचे आहे. त्यामुळे मी घोडेस्वारी करताना राजेश खन्नांसारखा पोशाख करुन बसायचो असे इरफानने सांगितले आहे. इरफान खानचा नुकताच हिंदी मीडिय हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. याचित्रपटात त्यांनी नेहमीप्रमाणे सिक्सर मारला आहे. नुकताच त्यांने हॉलिवूडचा चित्रपट ही साईन केला आहे. पजल असे या चित्रपटाचे नाव आहे. पजल या तित्रपटाची कथा 40 वर्षीय महिलेच्या आयुष्यावर आधारित आहे.या महिलेच्या खांद्यावर तिच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते. याचित्रपटाबाबत इरफान सांगतो, मी हॉलिवूडच्या एका चांगल्या चित्रपटाच्या कथेच्या शोधात होतो. ज्यात काहीतरी नवीन असेल. खूप वेळानंतर मला मला अशा चित्रपटाची ऑफर मिळाली. याचित्रपटातील माझी भूमिका एकदम वेगळी आहे. अशा प्रकारची भूमिका मी या आधी केली नसल्याचे इरफानने सांगितले आहे. पजल चित्रपटाचे दिग्दर्शन मार्क टर्टलटॉब करतोय. याचित्रपटात इरफानसोबत केली मैकडोनल्डसुद्धा असणार आहे. याचित्रपटाच्या शूटिंगसाठी इरफान न्यूयॉर्कला जाणार आहे. इरफानने आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे.आता इरफान सोशल मीडियावर आल्यामुळे त्याचे चाहते नक्कीच खूश असतील.