Join us  

'जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं' अशी काहीशी अवस्था झालीय इरफान खानची

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2018 4:48 PM

अभिनेता इरफान खान एंडोक्राईन ट्यूमर या दुर्धर आजाराने पीडित असून सध्या लंडनमध्ये उपचार घेत आहे. ट्रीटमेंटमुळे त्याच्या तब्येतीत सुधारणा होत आहे.

ठळक मुद्देइरफानचे केमोचे चार सेशन झाले पूर्णइरफान म्हणतो आयुष्य खूप रहस्यमय आहे

अभिनेता इरफान खान एंडोक्राईन ट्यूमर या दुर्धर आजाराने पीडित असून सध्या लंडनमध्ये उपचार घेत आहे. ट्रीटमेंटमुळे त्याच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. इरफानने नुकताच असोसिएटेड प्रेसला मुलाखत दिली. यामध्ये त्याने त्याच्या तब्येतीबद्दल सांगितले आहे. तसेच त्याचा आगामी हॉलिवूड चित्रपट 'पजल'विषयीदेखील सांगितले आहे. हा चित्रपट लॉस एंजिल्ससोबतच 11 शहरांमध्ये रिलीज होणार आहे.

इरफानने सांगितले की, "केमोच्या काही सहा सेशनमधून चार सेशन पूर्ण झाला आहे. सहा सेशन पूर्ण झाल्यानंतर आम्हाला पुन्हा कँसर स्कॅन करण्याची गरज आहे. तिसऱ्या स्टेपनंतर स्कॅनचा रिझल्ट पॉझिटव्ह आला आहे. परंतू तरीही आम्हाला सहा स्टेपचा रिझल्ट पहावा लागेल. हे सर्व मला कुठे घेऊन जाते हे यानंतर कळेल.""कोणत्याही व्यक्तीच्या जीवनाची गॅरेंटी नसते. मला असे वाटते की, मी आजारी आहे आणि काही महिन्यात किंवा एक-दोन वर्षात मरु शकतो. ज्याप्रकारे जीवन मला जगण्याचा मार्ग देत आहे, ते माझ्यासाठी संधीच आहे. मला असे वाटतेय की, चारही बाजूला अंधार असलेल्या रस्त्याने मी चालत आहे. आयुष्य मला काय देत आहे हे मी पाहू शकत नाही, असे इरफानने सांगितले व पुढे म्हणाला की,  तुम्ही विचार करणे थांबवा, योजना आखणे सोडा आणि गोंधळही सोडा, आयुष्याची दुसरी बाजू पाहा, ते आपल्याला खूप काही देत आहे. कारण मला वाटते की, माझ्याकडे दुसरे काही शब्द नाही तरीही धन्यवाद. माझी काहीच मागणी नाही. कोणती दूसरी रिक्वेस्टही नाही."असोसिएटेड प्रेसला दिलेल्या मुलाखतीत इरफान म्हणाला की, "मी सध्या स्क्रिप्ट वाचत नाही. हे सत्य आणि भ्रमाचा खरा अनुभव आहे. माझ्या दिवसांचे कोणतेही प्रेडिक्शन नाही. आता माझ्याकडे काही प्लान नाही. मी सकाळी ब्रेकफास्टसाठी उठतो आणि त्यानंतर काहीच प्लान नसतो. गोष्टी जशा माझ्याजवळ येत आहेत, तसे मी करत आहे."माझ्या आयुष्यात काही कमतरता मी स्वतःच ती नष्ट केली. आयुष्य खुप रहस्यमयी आहे आणि खुप काही देते. आपण फक्त ते घेण्याचा प्रयत्न करत नाही. मी आता यावर प्रेम करण्याचा प्रयत्न करतोय, असे इरफानने सांगितले.

टॅग्स :इरफान खान