Join us

इरफान खान म्हणतो, पुढे काय होईल ठाऊक नाही, या क्षणाला मी केवळ लढू शकतो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2018 10:25 IST

दुर्धर आजाराशी झूंज देत असलेला अभिनेता इरफान खान याच्यासाठी त्याचे चाहते दिवसरात्र प्रार्थना करत आहेत. तमाम चाहत्यांच्या, हितचिंतकांच्या शुभेच्छा, ...

दुर्धर आजाराशी झूंज देत असलेला अभिनेता इरफान खान याच्यासाठी त्याचे चाहते दिवसरात्र प्रार्थना करत आहेत. तमाम चाहत्यांच्या, हितचिंतकांच्या शुभेच्छा, सदिच्छा त्याच्या पाठीशी आहेत. पण इतक्या दुर्धर आजाराशी सामना करत असलेल्या इरफानच्या मनात सध्या काय चाललेय? नेमका याच भावना इरफानने आपल्या ‘टाईम्स आॅफ इंडिया’साठी लिहिलेल्या एका पत्रात व्यक्त केल्या आहेत. लंडनमध्ये उपचार घेत असलेल्या इरफानने व्यक्त केलेल्या या भावना कुठल्याही संवेदनशील मनाला पाझर फोडणा-या आहेत.तो लिहितो, ‘मी हाय ग्रेड न्यूरोएंडोक्राईन कॅन्सरशी लढतोय, हे माहित झाले, ती एक वेळ मागे पडली आहे. न्यूरोएंडोक्राईन कॅन्सर हा माझ्या शब्दकोशात एक नवा शब्द आहे, ज्याच्याबद्दल हा एक असाधारण आजार असल्याचे मला सांगण्यात आले. हा दुर्मिळातील दुर्मिळ आजार आहे आणि तुलनेने त्याबद्दल फार कमी माहित आहे, असेही मला कळले. त्यामुळे उपचारात अनिश्चितताचं अधिक होती. मी केवळ एका प्रयोगाचा भाग बनून राहिलो होतो. मी एका वेगळ्यात खेळात अडकलो होतो.  दिवसांत दिवसांपूर्वी मी सूसाट वेगाने धावणा-या गाडीचा प्रवासी  होतो. स्वप्नांचा पिच्छा करत, योजना अमलात आणत, महत्त्वाकांक्षा, उद्देशपूर्तीसाठी आयुष्य पणाला लावणारा प्रवासी आणि अचानक या प्रवासादरम्यान कुणीतरी माझ्या खांद्यावर थपकी मारली व मी वळून पाहिले. तो टीसी होता. तुझे मुक्कामाचे ठिकाण आले आहे, उतर, असे तो मला म्हणाला. मी गोंधळलो होतो. नाही, नाही, माझे मुक्कामाचे ठिकाण अद्याप आलेले नाही, असे मी म्हणालो. पण नाही, हेच तुझे मुक्कामाचे ठिकाण आहे. आयुष्य कधी कधी असेही असते, असे तो टीसी मला म्हणाला. या अनपेक्षित घटनेने मला माझ्या मर्यादा कळल्या. तुम्ही विशाल समुद्रात तरंगणा-या एका लहानशा कॉर्कप्रमाणे असता आणि त्याला नियंत्रित करण्यासाठी बैचेन असता, हे त्या अनपेक्षित धक्क्याने मला कळले.मनातील ही उलथापालथ, भीती, आश्चर्य या सगळ्यांमध्ये मी माझ्या मुलाला सांगत होतो की, या क्षणी मला हिंमत ठेवून या परिस्थितीचा सामना करायचा आहे. भीती, दहशत माझ्यावर हावी होता कामा नये आणि अचानक वेदनेची लहर अंगभर संचारली.   तीव्र वेदना उठल्या़ जणू आत्तापर्यंत मी केवळ वेदना समजण्याचा प्रयत्न करत होतो आणि आता मला ख-या वेदना, त्यांची तीव्रता कळली होती. त्यावेळी मी कुठलेही काम करत नव्हतो. कुठलीही सांत्वना वा प्रेरणा माझ्याजवळ नव्हती. त्यावेळी एकचं गोष्ट माझ्यासमोर होती, ती म्हणजे वेदना. जी त्याक्षणी मला परमेश्वरापेक्षाही मोठी भासू लागली. मी जसा हॉस्पीटलच्या आत चाललो होतो, तसा तसा संपत होतो. कमकुवत पडत  होतो. उदास होऊ लागलो होतो. माझे हॉस्पीटल ठीक लॉर्ड्स स्टेडियमच्या अपोझिट आहे, याची मला कल्पनाही नव्हती.   या वेदनेत मी विवियन रिचर्ड्सचे पोस्टर पाहिले. पण माझ्या मनात काहीच भावना नव्हती. कारण त्याक्षणी मी जगापासून पूर्णत: वेगळा होतो. हॉस्पीटलमध्ये माझ्या वर कोमा वॉर्ड होता. एकदा हॉस्पीटल रूमच्या बाल्कनीत उभा होतो आणि मनात विचित्र भावना होत्या. त्या विचित्र स्थिीतीने मला व्यापून टाकले होते. जीवन आणि मृत्यू यांच्यामध्ये केवळ हा एक रस्ता आहे. ज्याच्या एकीकडे हॉस्पीटल आहे आणि पलीकडे लॉर्ड्स स्टेडियम. ना हॉस्पीटल परिणांचा दावा करू शकत, लॉर्ड्स स्टेडियम. माझ्याकडे केवळ परमेश्वराने दिलेली अपार शक्ती आणि समज आहे. माझ्या हॉस्पीटलचे लोकेशन मला प्रभावित करते. जगात केवळ एकचं गोष्ट निश्चित आहे आणि ती म्हणजे अनिश्चितता.ALSO READ : इरफान खान, लॉर्ड्सवर मॅच पाहायला पोहोचलेला तूच का? पाकी पत्रकाराने केला फोटो व्हायरल!!मी याक्षणाला केवळ माझी सर्व शक्ती एकवटून ही लढाई संपूर्ण ताकदीनिशी लढू, इतकेच माझ्या हातात आहे. हे वास्तव जाणल्यानंतर कुठल्याही परिणामांची चिंता न करता मी माझी शस्त्रे म्यान केली आहेत. मला माहित नाही की आता ८ महिने, ४ महिने वा २ दोन वर्षांनंतर आयुष्य मला कुठे घेऊन जाईल. माझ्या डोक्यात आता कुठलीही चिंता नाही. मी सगळे मागे सोडले आहे. पहिल्यांदा सर्वार्थाने स्वातंत्र्य म्हणजे काय, हे मी अनुभवतोय. ही एक उपलब्धी आहे. जणू मी पहिल्यांदा आयुष्य जगतोय़ परमेश्वरावरची माझी श्रद्धा आणखी वाढली आहे़ जणू तो माझ्या रोमारोमात भिणलायं. पुढे काय होणार, हे काळचं ठरवणार. पण सध्या मी नेमके हेच अनुभवतोय. लोकांनी कायम माझे भले चिंतले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी अनेकांनी माझ्यासाठी प्रार्थना केली आणि ही प्रार्थना एक बनून माझ्याभोवती फिरतेय. ही ती शक्ती आह़े. ही शक्ती कायम माझ्यात असेल. तुम्ही आयुष्य नियंत्रित करू शकत नाही, हेच सत्य आहे.