Join us  

आपल्यामागे इतक्या कोटींची संपत्ती सोडून गेला इरफान खान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2020 3:42 PM

इरफान एका सिनेमासाठी साधारण १५ कोटींचे मानधन घ्यायचा.

इरफान खान, बॉलिवूडमधील एक हरहुन्नरी कलाकार. विविध चित्रपटात त्यांनी साकारलेल्या कसदार भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून गेल्या. यासोबतच कॅन्सरशी झुंज देऊन नव्याने त्यांनी चित्रपटसृष्टीत घेतलेली इंट्री आणि अचानक जगातूनच घेतलेली एक्झिट रसिक प्रेक्षकांना चटका लावणारी अशीच आहे.

इरफान खान आपल्या  कुटुंबासाठी राजस्थान पत्रिकेच्या रिपोर्टनुसार 321 कोटींची संपत्ती ठेवून गेला आहे. रिपोर्टनुसार इरफान खान एका सिनेमासाठी साधारण १५ कोटींचे मानधन घ्यायचा. इरफान आपल्या सिनेमातील प्रॉफिटचे शेअर घ्यायचा.  तर जाहिरातींसाठी ४ ते ५ कोटी. इरफानची ११० कोटींची पर्सनल गुंतवणूक आहे. त्याच्याकडे अनेक लग्झरी कार आहेत.त्यांची किंमत जवळपास ३ ते ५ कोटी इतकी आहे.  इरफानचे मुंबई एक घर आहे याशिवाय जुहूमध्ये एक फ्लॉटदेखील आहे. सर्वाधिक इन्कम टॅक्स भरणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्यांपैकी तो एक होता. 

इरफानने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली. त्याने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला चाणक्य, भारत एक खोज, बनेगी अपनी बात, चंद्रकांता यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले होते.

त्याने त्यानंतर एक डॉक्टर की मौत, सच अ लाँग जर्नी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मकबूलमधील भूमिकेमुळे मिळाली. पिकू, पान सिंग तोमर, द लंचबॉक्स, हिंदी मीडियम, मुंबई मेरी जान यांसारख्या बॉलिवूडच्या चित्रपटात एकापेक्षा एक दर्जेदार भूमिका साकारल्या होत्या.

टॅग्स :इरफान खान