Join us  

चिमण्यांच्या संवर्धनासाठी आलिया भटने घेतला पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 9:00 PM

बॉलिवूडची क्यूट गर्ल आलिया भटनेदेखील चिमण्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे.

भारतात चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त केली जात आहे. चिमण्याचे संवर्धन करण्यासाठी २० मार्च, २०१० पासून जागतिक चिमणी दिन साजरा करायला सुरूवात केली. या निमित्ताने पर्यावरणवादी चिमण्यांच्या संवर्धनासाठी विविक उपक्रम राबवत असतात. आता तर बॉलिवूडची क्यूट गर्ल आलिया भटनेदेखील चिमण्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. 

आलियाने ट्विटरवर क्राँकिटचं जंगल, झाडांची कत्तल यामुळे चिमण्यांचा अधिवास नष्ट होत चालला आहे. यामुळे चिमण्या नजरेस पडणे अशक्य झाले आहे. या चिमण्यांना परत आणण्याची शपथ ‘जागतिक चिमणी दिना’ निमित्त प्रत्येकांनी घ्या असे म्हटले आहे. आलियाने तिच्या चाहत्यांना कृत्रिम घरट्याच्या पर्यायाबद्दलही सुचवले आहे.

 

आलिया पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचे अनेक उपक्रम राबवते. तिने ‘CoExist’ या तिच्या फेसबुक पेजवर आपल्या लाखो चाहत्यांना चिमणीच्या संरक्षणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

प्लास्टिकच्या पिशव्या आणि बाटल्यांपासून चिमण्यांसाठी घरटी आणि फीडर कसं तयार करायचे हे देखील तिने आपल्या फेसबुकपेजवर सांगितले आहे.

टॅग्स :आलिया भट