Join us

​ मधूरच्या सिनेमात राधिका बनणार इंदिरा गांधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2016 22:09 IST

मधूर भांडारकर आपल्या नव्या चित्रपटाच्या  स्क्रिप्टवर मेहनत घेतोय. आणीबाणी आणि इंदिरा गांधी या घटनाक्रमावर आधारित सिनेमा मधूर भंडारकर घेऊन ...

मधूर भांडारकर आपल्या नव्या चित्रपटाच्या  स्क्रिप्टवर मेहनत घेतोय. आणीबाणी आणि इंदिरा गांधी या घटनाक्रमावर आधारित सिनेमा मधूर भंडारकर घेऊन येणार असल्याची बातमी आहे. या सिनेमासाठी मधूर सध्या रिसर्च करतोय, असेही ऐकीवात आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटातील लीड रोलमधील अभिनेत्रीचे नाव आधीच मधूरच्या डोक्यात आहे. कोण?? राधिका आपटे. होय, या सिनेमासाठी राधिकाला साईन करण्याचा मधूरचा विचार आहे. अर्थात खुद्द मधूर याबाबत काहीही बोललेला नाही. पण ही बातमी खरी ठरलीच तर राधिका इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसेल..ती कशी दिसेल, ते??