Join us
Daily Top 2Weekly Top 5

सतरा वर्षांनंतर भारताच्या मानुषी छिल्लरने जिंकला ‘मिस वर्ल्ड’चा ताज!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2017 22:28 IST

भारताच्या मानुषी छिल्लरने ‘मिस वर्ल्ड-२०१७’ या प्रतिष्ठित स्पर्धेचा ताज आपल्या नावे केला आहे. या अगोदर हा ताज १७ वर्षांपूर्वी ...

भारताच्या मानुषी छिल्लरने ‘मिस वर्ल्ड-२०१७’ या प्रतिष्ठित स्पर्धेचा ताज आपल्या नावे केला आहे. या अगोदर हा ताज १७ वर्षांपूर्वी म्हणजेच २००० साली अभिनेत्री प्रियंका चोपडा हिने जिंकला होता. सान्या शहर एरिना येथे आयोजित केलेल्या या समारंभात जगभरातील विविध देशांमधील १०८ सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. यासर्वांना धोबीपछाड देत भारताच्या मानुषीने हा ताज आपल्या नावे केला. ‘मिस वर्ल्ड-२०१६’ ची विजेती प्युटरे रिकोची स्टेफनी डेल वॅले हिने हा ताज नव्या विश्वसुंदरी मानुषीला परिधान केला. मानुषी छिल्लर हरियाणाची रहिवासी असून, तिने या अगोदर फेमिना मिस इंडिया २०१७ चा किताब जिंकला आहे. दरम्यान, मिस इंडिया मानुषीने तिच्या ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करून याबाबतची माहिती संपूर्ण भारतवासीयांना दिली आहे. या स्पर्धेविषयी सांगायचे झाल्यास दुसरे आणि तिसरे स्थान प्राप्त करणाºया मिस इंग्लड स्टेंफनी स्पर्धेत पहिली रनर-अप राहिली आहे, तर मिस मॅक्सिको एंड्रिया मेजा सेकेंड रनर-अप राहिली आहे. मानुषीला २५ जून २०१७ रोजी फेमिना मिस इंडियाच्या किताबाने सन्मानित करण्यात आले होते. मानुषीचा जन्म ५ सप्टेंबर रोजी आसममध्ये झाला. उच्च शिक्षणासाठी तिने दिल्लीतील विद्यापीठात प्रवेश घेतला. जेव्हा मानुषी मिस इंडिया बनली होती, तेव्हा तिने मीडियाला सांगितले होते की, मी एका अशा परिवारातून आले आहे, ज्यांच्याकरिता मॉडलिंग हे पूर्णपणे नवे प्रोफेशन आहे. कारण माझा परिवार शिक्षणावर अधिक भर देत नाही. त्यामुळेच माझ्या परिवारातून मॉडलिंगच्या दुनियेत येणारी मी बहुधा पहिलीच महिला आहे. जेव्हा तिला बॉलिवूडमध्ये काम करण्याविषयी विचारण्यात आले तेव्हा तिने संधी मिळाल्यास इंडस्ट्री ज्वॉइन करू असे म्हटले होते.