Join us  

एकेकाळी सलमान खानला टक्कर द्यायचा हा हिरो, एका अपघाताने बदलले होते आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 11:42 AM

या हिरोला त्याच्या अभिनयासाठी नाही तर त्यांच्या शानदार फिजिक आणि लुक्ससाठी ओळखले जात असे. बॉडी आणि लुक्सच्या बाबतीत हा अभिनेता सलमान खानलाही टक्कर देत होता.

ठळक मुद्देइंदरकुमारचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्याने आत्महत्या केली, अशीही चर्चा त्यावेळी होती.

बॉलिवूडचा हँडसम हंक इंदर कुमारला त्याच्या अभिनयासाठी नाही तर त्यांच्या शानदार फिजिक आणि लुक्ससाठी ओळखले जात असे. बॉडी आणि लुक्सच्या बाबतीत हा अभिनेता सलमान खानलाही टक्कर देत होता. 2017 मध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचे निधन झाले. इंडस्ट्रीत सलमानचा जिगरी अशी त्याची ओळख होती. सलमानच्या ‘तुमको ना भूल पाएंगे’ आणि ‘वॉन्टेड’ सारख्या चित्रपटात त्याने काम केले. आज इंदरचा वाढदिवस.26 ऑगस्ट 1973 रोजी राजस्थानच्या जयपूरमध्ये इंदरचा जन्म झाला होता. ‘मासूम’ या चित्रपटापासून त्याने आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती. यात आयशा जुल्का त्याची हिरोईन होती.

इंदरचे करिअर फार खास नव्हते. तो कायम साईड हिरोच्या भूमिकेत दिसला. एका चित्रपटाच्या शूटींगवेळी अशी काही घटना घडली की, इंदरचे आयुष्य आणि करिअर दोन्ही उद्धवस्त झाले. ही घटना आहे, ‘मसीहा’ चित्रपटाच्या सेटवरची. दिग्दर्शक पार्थो घोष दिग्दर्शित या चित्रपटात इंदरचा एक हेलिकॉप्टर सीन होता. या स्टंट सीनच्या शूटींगदरम्यान इंदर अचानक हेलिकॉप्टरमधून खाली पडला. या अपघातानंतर डॉक्टरांनी इंदरला तीन वर्षे बेड रेस्ट सांगितला आणि इंदर चित्रपटांपासून दूर गेला.

या अपघातानंतर इंदर कुमार पुन्हा आपल्या पायावर उभा होऊ शकेल की नाही,याचीही शाश्वती नव्हती. एका मुलाखतीत इंदरने  सांगितले होते की, शूटींगदरम्यान मी हेलिकॉप्टरमधून पडलो. तीन वर्षे मला बेड रेस्ट सांगितला गेला. मी माझ्या पायावर उभा होऊ शकेल की नाही, याचीही शाश्वती नव्हती.तीन वषार्नंतरच्या घडामोडीदरम्यान इंदरला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. मिडे डेला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल इंदरने सांगितले होते की, माझ्या अटकेनंतर माझी मुलगी आजारी पडली. माझ्या पत्नीने माझ्या जामीनासाठी अनेकांकडे मदत मागितली. पण त्यावेळी कुणीच मदतीला आले नाही. घर भाड्याने घ्यायलाही पैसे नव्हते. एका मित्राने मला त्याच्या घरात आश्रय दिला. त्याकाळात डॉली बिंद्राने माझी मदत केली. तिच्याशिवाय फिल्म इंडस्ट्रीतल्या कुण्याही व्यक्तिने मला एक साधा फोनही केला नाही.

चर्चा खरी मानाल तर, या काळात इंदरला ‘बिग बॉस’ची ऑफरही आली होती. पण सलमानने त्याला ही ऑफर न स्वीकारण्याचा सल्ला दिला होता. कारण सलमान इंदरच्या प्रकृतीबद्दल माहित होते. सलमानवर विश्वास ठेवून इंदरने ही ऑफर नाकारली होती.इंदरकुमारचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्याने आत्महत्या केली, अशीही चर्चा त्यावेळी होती. मृत्यूपूर्वीच्या त्याच्या एका व्हिडिओमुळे या चर्चेलाबळ मिळाले होते. मी आत्महत्या करू इच्छितो, मी खूप दूर जातोय,असे तो या व्हिडिओ म्हणतांना दिसला होता. पण नंतर हा व्हिडिओ त्याच्या आगामी चित्रपटाच्या तयारीचा होता, असे सांगितले गेले.

टॅग्स :सलमान खान