Join us
Daily Top 2Weekly Top 5

इलियाना डिक्रुझने केलंय लग्न, पतीसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 10:41 IST

Ileana D'cruz : मुलाच्या जन्मानंतर बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझने अखेर तिच्या लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

इलियाना डिक्रूझ(Ileana D'cruz )ने एप्रिल २०२३ मध्ये इन्स्टाग्रामवर ती प्रेग्नेंट असल्याचे जाहीर केले होते. काही महिन्यांनंतर, तिने घोषित केले की ऑगस्टमध्ये तिच्या पहिल्या मुलाला, कोआ फिनिक्स डोलनला जन्म दिला आहे. इलियानाचे वैयक्तिक आयुष्य गेल्या वर्षभरापासून चर्चेत आहे आणि काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की तिने अमेरिकेत राहणाऱ्या मायकेल डोलनशी लग्न केले आहे. दरम्यान आता तिने एका मुलाखतीत तिच्या लग्नाच्या वृत्तांवर मौन सोडले आहे.

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या लग्नाच्या बातम्या आणि अफवांना ब्रेक लावला आहे. इलियाना डिक्रूझने मुलाखतीदरम्यान मायकेल डोलनबद्दल मौन बाळगले पण जेव्हा तिला विचारण्यात आले की त्याने तिला किती पाठिंबा दिला तेव्हा ती भावूक झाली. मायकेलसोबतच्या तिच्या आयुष्याविषयी बोलताना ती म्हणाली, "विवाहित आयुष्य खूप छान चालले आहे. मला त्यात काय आवडते हे सांगणे खरोखर कठीण आहे. मला खरोखर विचार करावा लागेल कारण प्रत्येक वेळी मी उत्तर देते तेव्हा काहीतरी वेगळे घडते."

ती पुढे म्हणाली, "त्याने मला माझ्या सर्वात वाईट, माझ्या सर्वात वाईट वेळी पाहिले आहे. त्याने मला माझ्या सर्वोत्तम काळातही पाहिले आहे. तो पहिल्या दिवसापासून खंबीर आहे. तो नेहमीच माझ्या पाठिशी उभा राहिला आहे आणि तेच आहे. हे 'दो और दो प्यार के' डायलॉगसारखेच आहे."

 'दो और दो प्यार'बद्दल इलियानाचा चित्रपट 'दो और दो प्यार' १९ एप्रिलला रिलीज झाला. गुहा ठाकुरता यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट विद्या बालन, प्रतीक गांधी, सेंथिल राममूर्ती यांच्या प्रमुख भूमिका आहेत आणि हा चित्रपट एका एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर आधारित आहे.

इलियाना डिक्रूझचे लग्नडीएनए २०२३ च्या रिपोर्टनुसार, १ ऑगस्ट २०२३ रोजी कोआ फिनिक्स डोलनच्या बाळाचे स्वागत करणारी इलियानाने गेल्या वर्षी लग्न केले. रिपोर्टमध्ये, अभिनेत्रीच्या लग्नाची तारीख १३ मे २०२३ अशी नमूद करण्यात आली होती, जी इलियानाने तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा करण्याच्या चार आठवड्यांपूर्वी होती. 

टॅग्स :इलियाना डीक्रूज