IIFA Awards 2017 LIVE...सलमान खानने गायले ‘के मैं हू हिरो तेरा...’
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2017 11:09 IST
‘आयफा’चा वार्षिक सोहळा साजरा करण्यासाठी गत तीन दिवसांपासून अख्खे बॉलिवूड न्यूयॉर्कमध्ये आहे आणि अखेर ती ‘क्लायमॅक्स’ची रात्र आली. न्यूयॉर्कच्या ...
IIFA Awards 2017 LIVE...सलमान खानने गायले ‘के मैं हू हिरो तेरा...’
‘आयफा’चा वार्षिक सोहळा साजरा करण्यासाठी गत तीन दिवसांपासून अख्खे बॉलिवूड न्यूयॉर्कमध्ये आहे आणि अखेर ती ‘क्लायमॅक्स’ची रात्र आली. न्यूयॉर्कच्या घड्याळात आठचा ठोका वाजला आणि आयफा पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली. पुरस्कार सोहळ्यासाठी आलेल्या सेलिब्रिटींना बोलते करण्याचा जिम्मा उचलला तो अँकर व अभिनेता मनीष पॉल याने. सर्वप्रथम मनीषने सलमान खानला बोलते केले. ‘सुल्तान’मधील एखादा डायलॉग म्हणून दाखव, अशी गळ त्याने सलमानला घातली. पण सलमानला कदाचित ‘सुल्तान’चा एकही डायलॉग पूर्णपणे आठवत नसावा. मग काय, ‘के मै हूं हिरो तेरा... ’ या गाण्याच्या चार ओळी गात त्याने वेळ मारून नेली. अर्थात त्याच्या तोंडून गाण्याच्या या चार ओळी ऐकून पब्लिक क्रेझी झाली. नवाजुद्दीन सिद्दीकीला मनीषने ‘किक’मधील त्याच्या गाजलेल्या स्टाईलची कॉपी करायला सांगितली तर शाहिद कपूरला मिका सिंगच्या ‘गंदी बात’वर डान्सच्या चार-दोन स्टेप्स करायला सांगितल्या. शाहिदसोबत त्याची बेटर हाफ मीरा राजपूतही एकदम स्टाईलिश अंदाजात दिसली. यानंतर शिल्पा शेट्टीला मनीषने गाळले आणि तिला योगा डान्सच्या काही स्टेप्स करायला सांगितल्या. यावर शिल्पाने ्न‘ठुमका आसन’ करून योगाबद्दलचे स्वत:चे प्रेम जगजाहिर केले. अनिल कपूर, अतुल कस्बेकर, दिव्या कुमार खोसला, दिया मिर्झा, सोनू सूद, प्रिती झिंटा आदींनी ग्रीन कार्पेटवर कॅमेºयांपुढे पोझ दिल्या.