iifa awards-2017 : exclusive सलमान खानच्या ‘ह्यूमर’ने रंगली आयफाची पत्रकार परिषद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2017 14:15 IST
हॉलिवूड बॉलिवूडच्या वेगवेगळ्या कलाकारांना संधी देत असताना, न्यूयॉर्कमध्ये बॉलिवूडचा आयफा सोहळा रंगतो आहे. काल रात्री आयफाची पत्रकार परिषद रंगली. ...
iifa awards-2017 : exclusive सलमान खानच्या ‘ह्यूमर’ने रंगली आयफाची पत्रकार परिषद!
हॉलिवूड बॉलिवूडच्या वेगवेगळ्या कलाकारांना संधी देत असताना, न्यूयॉर्कमध्ये बॉलिवूडचा आयफा सोहळा रंगतो आहे. काल रात्री आयफाची पत्रकार परिषद रंगली. या पत्रपरिषदेत सलमान खान, कॅटरिना कैफ एकत्र दिसले. आलिया भट्ट, अनिल कपूर, अनुपम खेर, सोनाक्षी सिन्हा यांनीही या पत्रपरिषदेला हजेरी लावली. सलमानने आपल्या ‘ह्यूमर’ने तीन तास चाललेल्या या प्रेस मीटमध्ये चांगलेच रंग भरले. आयफाचे ‘आश्रयदाते’ अर्थात बॉलिवूडवर भरभरून प्रेम करणारे भारतीय-अमेरिकन चाहते आपल्या कुटुंबासोबत या प्रेस मीटला हजर होते. सलमान, सोनाक्षी, अनिल कपूर यांना भेटण्यासाठी त्यांची एकच चढाओढ सुुरू होती. बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत सेल्फी काढण्यासाठी, त्यांच्या आॅटोग्राफसाठी अनेकांचे प्रयत्न सुरु होते. एकंदर काय, न्यूयॉर्कमधील बॉलिवूड प्रेमींचा उत्साह दांडगा होता. कॅटरिना व सलमान खान हे दोघे या पत्रकार परिषदेतचे मुख्य आकर्षण ठरले. सलमान यावेळी आपल्या चिर-परिचित अंदाजात दिसला. प्रत्येक प्रश्नाला त्याने आपल्या याच अंदाजात उत्तरे दिलीत. पत्रकार परिषदेत सलमानला बोलण्याची विनंती केली, तेव्हा तर त्याने धम्माल उडवून दिली. आयफा पुरस्कार सोहळा कोणत्या दिवशी आहे,हे मला आठवत नाहीये, असे तो म्हणाला. मग काय, पत्रपरिषदेत आलेल्या सगळ्यांनी एका सूरात ओरडत, पुरस्कार सोहळा १६ ला आहे, असे त्याला सांगितले. पण सलमान मस्तीच्या मूडमध्ये होता. १६ ला पुरस्कार सोहळाआहे, हे मला आठवत नाही, पण या दिवशी कॅटरिनाचा वाढदिवस आहे, हे माझ्या चांगलेच लक्षात आहे, असे तो म्हणाला. इतकेच नाही तर आता सर्वांनी मिळून कॅटला विश करूया,असेही त्याने जाहिर करून टाकले. मग काय, सलमानने स्वत:च हॅपी बर्थडे कॅटरिना गायला सुरुवात केली . यानंतर कॅटरिनाची टर उडवतानाही तो दिसला. वाढदिवसाचे गाणे गायले की, तुम्हाला समोरच्याकडून काहीतरी मिळते, असे म्हणत त्याने त्याचक्षणी कॅटला अलिंगनही दिले. सलमान व कॅटरिना एकमेकांना अलिंगन देताना पाहून उपस्थितांनी दोघांनाही चांगलेच चिअर अप केले. आलिया भट्टला यावेळी प्रश्न विचारण्यात आला. पण तिच्या प्रश्नाचे उत्तर कॅटरिनानेच दिले. आलिया तू सलमानसोबत कधी काम करणार? असे तिला विचारले गेले. या प्रश्नावर आलिया काही बोलणार, तोच कॅटने माईक घेतला. प्लीज, आलियाला वरूणसाठी सोडा आणि सलमानला माझ्यासाठी, असे तीम्हणाली. तिच्या या उत्तराने पत्रपरिषदेत चांगलीच खसखस पिकली.