Join us

​IIFA 2017 : Exclusive : OMG! असे काय घडले की सलमान खान आयफाच्या स्टेजवरून खाली उतरून गेला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2017 12:54 IST

आयफा पुरस्काराची पत्रकार परिषद सुरू असताना सलमान खान स्टेजवरून निघून गेला हे ऐकून नक्कीच तुम्हाला धक्का बसला असेल. सलमान ...

आयफा पुरस्काराची पत्रकार परिषद सुरू असताना सलमान खान स्टेजवरून निघून गेला हे ऐकून नक्कीच तुम्हाला धक्का बसला असेल. सलमान कधी काय करेल याचा कधीच भरवसा नसतो. त्यामुळे आता त्याला कशाचा राग आला की तो स्टेजवरून उतरून गेला हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. पण त्याला कशाचा राग आलेला नाही तर एका चांगल्या कामासाठी तो स्टेजवरून खाली उतरला.आयफाची पत्रकार परिषद सुरू असताना सलमानसोबत, आलिया भट्ट, शाहिद कपूर, वरुण धवन, कॅटरिना कैफ, सुशांत सिंग रजपूतसारखे बॉलिवूडचे सेलिब्रेटी स्टेजवर उपस्थित होते. पत्रकार परिषद मस्त रंगली होती. आयफा पुरस्काराच्या टीमकडून काही चॅरिटेबल संस्थांना नेहमीच मदत केली जाते. या चांगल्या कामासाठी आयफातील काही मंडळींचा सत्कार पत्रकार परिषदेत केला जात होता. सत्कार करण्यासाठी एका व्यक्तिचे नाव पुकारण्यात आले आणि तेवढ्यात सलमान सलमान स्टेजवरून खाली उतरायला लागला.  उपस्थितांना काय झाले हे कळतच नव्हते. तो कंटाळून खाली उतरला असेच सगळ्यांना वाटत होते. आयोजकांना तर सलमान खाली उतरतोय हे पाहून चांगलेच टेन्शन आले होते. त्यांना धडकीच भरली होती असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. पण सलमान कोणत्या कारणासाठी खाली उतरला हे पाहिल्यावर सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.सत्कार स्वीकारण्यासाठी ज्या व्यक्तीचे नाव पुकारण्यात आले होते, ते अतिशय वृद्ध होते. त्यांना चालायला खूप त्रास होत होता. ते पाहाताच सलमान खाली उतरला आणि त्यांचा हात पकडून त्यांना स्टेजवर घेऊन आला.