Join us  

Kangana Ranaut: देश जोडण्याबद्दल बोललं तर इथे लोकांना प्रॉब्लेम आहे; कंगना राणौतचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 10:02 AM

Kangana Ranaut controversial statement: बॉलिवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये फरक विचारला असता, तिने बॉलिवूडवर तोंडसुख घेतले. आरजे रौनकने तिची मुलाखत घेतली.

कंगना राणौतचा (Kangana Ranaut) साऊथच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये थलायवी (Thalaivii) सिनेमा रिलीज झाला आहे. या पार्श्वभूमीवर कंगना पुन्हा मुलाखती देत सुटली असून बॉलीवूडवर टीका केली आहे. दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्री बॉलिवूडपेक्षा कितीतरी पटीने काम करण्यासाठी अधिक सुसंवादी आणि परिचित ठिकाण असल्याचे म्हटले आहे. याचबरोबर कंगनाने नेहमीप्रमाणे काही वादग्रस्त वक्तव्येदेखील केली आहेत. तसेच मोठे आर्थिक नुकसान झाल्याचेही म्हटले आहे. (Kangana Ranaut hilarious statements on United in Country, bollywood.)

आरजे रौनकने तिची मुलाखत घेतली. यामध्ये कंगनाला तिच्या राजकीय मतांवर आणि कोणाचीतरी बाजू घेत असल्यावरून होणारी सोशल मीडियावरील टीका यावर विचारण्यात आले. तेव्हा तिने म्हटले की, जेव्ह मी देशाकडे एक अभिनेत्री म्हणून पाहते, तेव्हा तुम्ही देश तोडण्याची जेव्हा भाषा करता तेव्हा काहीच समस्या नसते. परंतू जेव्हा तुम्ही देश जोडण्याची भाषा करता तेव्हा लोकांना समस्या सुरु होते. माझ्या ब्रँडनी मला बोलण्यास बंदी घातली, माझ्य़ाशी केलेली कॉन्ट्रॅक्ट रद्द केली, मला यामुळे करोडोंमध्ये आर्थिक तोटा झाला आहे. 

यानंतर कंगनाला सोशल मीडियावर पोस्ट करताना दोनवेळा विचार करते का, असा सवाल विचारण्यात आला. तेव्हा तीने मी स्ट्रेटफॉवर्ड असल्याचे सांगत दोनदा विचार करत नसल्याचे सांगितले. माझा माझ्या आयुष्याशी असलेला दृष्टिकोन हा मी जसा आहे तसा आहे. मी दोन मुखवटे बाळगत नाही. माझी विचार प्रक्रिया स्तरित आणि गुंतागुंतीची असू शकते, परंतु दोन मुखवटे नाहीत, ज्यातील एक चेहरा हा लोकांसाठी आणि आपल्यासाठी असे मी करत नाही, असे उत्तर कंगनाने दिले. 

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये फरक विचारला असता, तिने बॉलिवूडवर तोंडसुख घेतले. बॉलिवूड पुढे आणण्यासाठी इथे कोणीही नाही. इथे दुसऱ्यांना खाली खेचण्यासाठी खेकड्याच्या मानसिकतेचे जळणारे लोक खूप आहेत. त्यांचा तिकडेच जास्त लक्ष असतो. या गोष्टी बदलतील अशी आशा आहे, असे ती म्हणाली. 

टॅग्स :कंगना राणौतथलायवी