Join us  

तर या अभिनेत्रीमुळे सिद्धार्थ मल्होत्राने सोडला सलमान खानचा रेस 3 ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 9:34 AM

टायगर जिंदा है च्या शूटिंगनंतर सलमान लगेचच रेस 3 च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. हे आम्ही तुम्हाला आधीच सांगितले ...

टायगर जिंदा है च्या शूटिंगनंतर सलमान लगेचच रेस 3 च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. हे आम्ही तुम्हाला आधीच सांगितले होते. या चित्रपटाबाबत आम्ही तुम्हाला आणखीन एक बातमी देणार आहोत. जी ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मिळालेल्या माहितीनुसार सलमान खानच्या रेस 3 चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्राने काम करण्यास नकार दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सिद्धार्थला या चित्रपटाची स्क्रिप्ट फारशी आवडली नव्हती तसेच शूटिंगच्या डेट्सना घेऊन ही त्याला प्रोब्लेम होता.  या चित्रपटात सिद्धार्थच्या अपोझिट डेजी शाह आहे म्हणून त्यांना या चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याचे समजते आहे. सिद्धार्थला या चित्रपटात त्याच्या अपोझिट एखादी टॉपची अभिनेत्री हवी होती. मात्रनंतर त्याला कळले या चित्रपटात त्याच्या अपोझिट डेजी शाह आहे मग त्यांना चित्रपटातून काढता पाय घेणेचे सोईस्कर समजले. सिद्धार्थने नकार दिल्यानंतर त्याच्या भूमिकेसाठी आदित्य रॉय कपूरला अप्रोच करण्यात आले होते. मात्र चित्रपटाच्या निर्मात्यांनी शेवटी या भूमिकेसाठी बॉबी देओलचे नाव फायनल केले.  रेसचे निर्माता रमेश तौरानीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटले 'मी मुख्य भूमकेसाठी सलमान आणि जॅकलिन फर्नांडिसची निवड केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसुझा करणार आहे. याचित्रपटाची शूटिंग मुंबईत होणार आहे. आधी या चित्रपटाच्या शूटिंगला आबुधाबीमधून सुरुवात होणार होती. मात्र बिग बॉसच्या शूटिंग मुंबईत सुरु असल्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगला देखील मुंबईत सुरुवात होणार आहे.कॅटरिना कैफ आणि सलमान खानच्या जोडीचा टायगर जिंदा है चित्रपट ख्रिसमच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटातील गाणं सलमान आणि कॅटरिना ग्रीसमध्ये शूट करुन आले आहे. तब्बल पाच वर्षांनी दोघांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. टायगर जिंदा है हा चित्रपट २०१२ मध्ये आलेला एक था टायगरचा  सिक्वेल आहे. खरतर या चित्रपटाची कथा पूर्णपणे नवीन असल्याचा दावा चित्रपटाचे दिग्दर्शक अब्बास जफरने काही दिवसांपूर्वी दिलेल्या आपल्या मुलाखतीत केला आहे.ALSO RAED :  दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही जॅकलिन फर्नांडिस आणि सिद्धार्थ मल्होत्रा करत राहिले किसिंग