Join us

सलमान खान तुरुंगात गेला तर बॉलिवूडला होऊ शकते इतक्या कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 14:14 IST

काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर सत्र न्यायालयाने सलमानला दोषी ठरवले आहे. जर सलमान खान तुरुंगात गेला तर त्याचा परिणाम त्याच्या ...

काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर सत्र न्यायालयाने सलमानला दोषी ठरवले आहे. जर सलमान खान तुरुंगात गेला तर त्याचा परिणाम त्याच्या आगामी चित्रपटांवर होऊ शकतो. नुकताच आबुधाबी मध्ये 'रेस3'ची शूटिंग संपवून सलमान मुंबईत परतला आहे. यानंतर तो 'दबंग 3' आणि 'भारत'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. सध्या शिक्षेला घेऊन सलमान खान तणावामध्ये आहे. दंबग 3 आणि भारतच्या शिवाय 'किक2'ची घोषणा सुद्धा करण्यात आली आहे. अशात जर सलमान खान तुरुंगात गेला तर या चित्रपटांची शूटिंग लांबणीवर जाऊ शकते. या तीन प्रोजेक्टवर मिळून जवळपास 550 कोटी  लागले आहेत. याशिवाय बिग बॉसचा 12 सीजन आणि 'दस का दम'सुद्धा टीव्हीवर सुरु होणार आहेत. सलमानच्या दस का दमचा प्रोमोसुद्धा आऊट झालेला आहे. यावेळेत जर सलमान आता गेला तर इंडस्ट्रीला जवळपास 600 कोटींचे नुकसान होऊ शकते.  मिळालेल्या माहितीनुसार 'दबंग 3'साठी अरबाज खान स्क्रिप्टिंग करतो आहे. आपल्या इंटरव्हु दरम्यान अरबाज खानने सांगितले होती की एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत 'दबंग 3'चे स्क्रिप्ट तयार होणार आहे. ज्यानंतर पुढचा प्लॉन करण्यात येणार आहे. सलमान खान याच महिन्यांपासून चित्रपटाची शूटिंग सुरु करणार असल्याची चर्चा आहे. मात्र जर सलमान खान तुरुंगात गेला तर हे सगळे प्लनिंग फिसकटेल. सलमान खान बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर ताबडोताब गल्ला करतात. सलमानच्या काही महिन्यांपूर्वी आलेल्या 'टायगर जिंदा है'ने चार आठवड्यांमध्ये भारतात तब्बल ३२९.७५ कोटी रूपयांची कमाई केली आहे. यातील सलमान आणि कॅटरिनाची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली होती.  ‘टायगर जिंदा है’ने सलमान खानच्या सर्वाधिक कमाई करणाºया ‘बजरंगी भाईजान’ला मागे टाकले आहे.  गेल्या काही वर्षात सलमानच्या करिअरचा ग्राफ कमालीचा वर गेलेला दिसतो. वीर’, ‘जय हो’ आणि‘ट्यूबलाइट’ सारख्या चित्रपटांनी ही बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला होता.