Join us
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या ऑडिशनला रिजेक्ट झाला होता नवाजुद्दीन सिद्दीकी, स्वत: केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 15:56 IST

रितेश बत्रा यांचा 'फोटोग्राफ' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. या सिनेमाचा ट्रेलर आणि पोस्टरबघून सिनेमाबाबतची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.

ठळक मुद्देसान्या -नवाजुद्दीन सिद्दीकीची जोडी पडद्यावर पाहण्यास प्रेक्षक आतुर आहेत

रितेश बत्रा यांचा 'फोटोग्राफ' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. या सिनेमाचा ट्रेलर आणि पोस्टरबघून सिनेमाबाबतची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. सान्या मल्होत्रा आणि नवाजुद्दीन सिद्दीकीची जोडी पडद्यावर पाहण्यास प्रेक्षक आतुर आहेत. 

नवाजला स्ट्रगलिंगच्या दिवसांत ऑडिशन दरम्यान अनेक सिनेमांमधून रिजेक्ट करण्यात आले होते. नवाजने पहिल्यांदा ऑडिशनसाठी जेव्हा आपला फोटो पाठवला होता. त्यावेळी त्याला फोटोग्राफरच्या भूमिकेसाठी बोलवण्यात आले होते. मात्र त्याला रिजेक्ट करण्यात आले. नुकताच ही गोष्ट नवाजने एक इव्हेंटच्या दरम्यान शेअर केला.   

नवाज आणि सान्याचा फोटोग्राफ सिनेमा धारावीमधल्या एका फोटोग्राफरवर आधारित आहे. या सिनेमात सान्या मल्होत्रा एका गुजराती मुलीची भूमिका साकारते आहे. सान्या दिल्लीत लहानाची मोठी झाली आहे. गुजराती मुलीची भूमिका साकारण्यासाठी तिने  भाषेवर विशेष मेहनत घेतली . सान्याला ही भूमिका साकार करण्यात कोणतीच कसर सोडायची नव्हती. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, ''फोटोग्राफ'मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत काम करणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. कारण नवाजुद्‌दीन हा माझा आवडता अभिनेता असल्याने त्याच्यासोबत काम करण्याचे माझे स्वप्न पूर्ण होत आहे.'' 

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकीसान्या मल्होत्रा