Join us  

कतरिना कैफने दिलेली वस्तू आजही वापरतो सलमान खान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 6:30 AM

कतरिनाने काही वर्षांपूर्वी दिलेली एक गोष्ट सलमान खान आजही वापरत असल्याचे त्याने एका मुलाखतीत सांगितले आहे.

ठळक मुद्देसलमानने सांगितले आहे की, कतरिनाने मला काही वर्षांपूर्वी एक बेल्ट दिला होता. तो आजही मी वापरतो.

भाईजान सलमान खानच्या चाहत्यांना केवळ दोन गोष्टींची प्रतीक्षा असते. एक म्हणजे, भाईजानचा सिनेमा आणि दुसरी म्हणजे, भाईजानचे लग्न कधी होणार, या प्रश्नाचे उत्तर. चित्रपटाचे म्हणाल तर दरवर्षी भाईजान एक तरी ब्लॉकबस्टर सिनेमा घेऊन येतो. पण भाईजानच्या लग्नासाठी मात्र चाहत्यांना बरीच प्रतीक्षा करावी लागतेय. आत्तापर्यंत अनेकींशी सलमानचे नाव जोडले गेले आहे.

ऐश्वर्या राय, संगीता बिजलानी, सोनी अली, कतरिना कैफ या अभिनेत्रींसोबतच्या सलमानच्या अफेअरची मीडियात चांगलीच चर्चा झाली आहे. कतरिना कैफ आणि सलमानने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. त्या दोघांच्या रिअल लाईफ जोडीची देखील त्यांचे फॅन्स नेहमीच चर्चा करतात. सलमान आणि कतरिना यांच्यात मैत्रीपेक्षा जास्त काही आहे का हे केवळ ते दोघेच सांगू शकतात. पण या दोघांची मैत्री खूपच घट्ट आहे. आपल्या लाडक्या मैत्रिणीनी काही वर्षांपूर्वी दिलेली एक वस्तू सलमान आजही वापरतो असे त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे.

सलमानने सांगितले आहे की, कतरिनाने मला काही वर्षांपूर्वी एक बेल्ट दिला होता. तो आजही मी वापरतो. सलमानचा लवकरच दबंग 3 हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याचे फॅन्स या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटात त्याची जोडी सोनाक्षी सिन्हासोबत जमणार असून या चित्रपटाद्वारे सई मांजरेकर चित्रपटसृष्टीत प्रवेश करणार आहे. 

टॅग्स :सलमान खानकतरिना कैफ