Join us

​ प्राचीने इशा-या इशा-यात मागितली श्रद्धाला मदत!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2016 12:42 IST

फरहान अख्तरचा ‘रॉक आॅन2’चा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. फरहान, श्रद्धा कपूर, प्राची देसाई यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या ...

फरहान अख्तरचा ‘रॉक आॅन2’चा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. फरहान, श्रद्धा कपूर, प्राची देसाई यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरु आहे. काल-परवा प्रमोशनल फंडा म्हणून चित्रपटाचे कॉन्सर्ट आयोजित केले गेले. यात प्राची, श्रद्धा दोघीही सामील झाल्या. पण या कॉन्सर्टदरम्यान प्राची पूर्णवेळ एकाच गोष्टीने चिंतीत दिसली. ती म्हणजे तिचा ड्रेस. कॉन्सर्टमध्ये फरहान व श्रद्धा या दोघांनी लाइव्ह परफॉर्मन्स दिला. त्यावेळेत प्राची प्रेक्षकांसोबत बसून एन्जॉय करताना दिसली. पण ती जशी अन्य स्टारकास्टसोबत स्टेजवर गेली, तशी तिच्या ड्रेसबद्दल चिंतीत झाली.स्टेजवर खुर्च्या मांडलेल्या होत्या. मात्र प्राचीच्या ड्रेसमुळे तिला त्यावर बसला येईना. कुठे काही गडबड होऊ नये, म्हणून प्राची धडपडतांना दिसली. याच चिंतेत ती अनेकदा श्रद्धासोबत इशाºया इशाºयात बोलताना दिसली. काही गडबड तर नाहीयं ना? असे तिने श्रद्धाला इशाºया इशाºयात विचारले. श्रद्धाने हिरवा कंदील दिल्यावरच कुठे ती रिलॅक्स झाली आणि आरामात तिच्या खुर्चीवर बसली. या कार्यक्रमात प्राचीने काळ्या रंगाचा मिनी ड्रेस घातला होता. या ड्रेसमध्ये ती कम्फर्टेबल नव्हती, हे स्पष्ट दिसत होते. ‘रॉक आॅन2’मध्ये श्रद्धाला अधिक महत्त्व दिले जात असल्याचे प्राची नाराज आहे, अशा बातम्या मध्यंतरी आल्या. मात्र ‘रॉक आॅन2’च्या ट्रेलर लॉन्चदरम्यान प्राची श्रद्धाला चीअर्स करताना दिसली. दोघींमध्ये कोल्ड वॉर सुरु आहे, असे कुठेही दिसले नाही. अडचणीच्या वेळी श्रद्धा प्राचीच्या मदतीला धावून आली, कदाचित त्यामुळेच!!