Join us  

दिवसाला १८ तास काम करणाऱ्या सोनू सूदला येतात ५६ हजारांहून अधिक मेसेजेस, अशाप्रकारे चालते काम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 12:32 PM

हजारांहून मजूरांना दिवसाला मदत करणाऱ्या सोनूचे सगळेच कौतुक करत आहे तर या उलट कोणाचे मेसेज वाचायचे राहिले तर मला माफ करा... असे तो लोकांना सांगत आहे.

ठळक मुद्देसोनू आपल्याला आपल्या घरापर्यंत पोहोचवणार याची अनेक मजूरांना खात्री असल्याने ते मेसेज, सोशल मीडिया यांच्या माध्यमातून सोनूकडून मदत मागत आहेत.

अभिनेता सोनू सूद लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरीत मजूरांसाठी देवदूत ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनूने लॉकडाऊनमुळे अडकलेल्या हजारो स्थलांतरीत मजूरांना त्यांच्या घरी रवाना केले. सोनूच्या या कामाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. सोशल मीडियावर सोनू ट्रेंड करतोय. सोनू चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत असला तरी सध्या यामुळे खऱ्या आयुष्यात तो नायक बनला आहे. 

सोनू आपल्याला आपल्या घरापर्यंत पोहोचवणार याची अनेक मजूरांना खात्री असल्याने ते मेसेज, सोशल मीडिया यांच्या माध्यमातून सोनूकडून मदत मागत आहेत. सोनू दिवसाला हजारोहून अधिक मजूरांना घरी पाठवत आहे. सोनू आणि त्याची टीम हे काम कशाप्रकारे करते, त्यांना दिवसाला किती मेसेजेस येतात, मजूरांना कशाप्रकारे मदत केली जाते असे अनेक प्रश्न लोकांना पडलेले आहेत. सोनूने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या या कामाविषयी माहिती दिली आहे. त्याने या मुलाखतीत सांगितले आहे की,तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण मला दिवसाला ५६००० तरी मेसेजेस येतात. माझे दिवसातील १८ तास तरी या कामात जातात. मजूरांना पाठवण्यासाठी संपर्क साधायचा, बसेसची व्यवस्था करायची ही कामं दिवसभर मी आणि माझी टीम करत असते. या कामात माझ्या घरातील मंडळी देखील मला मदत करतात.

सोनूने काही दिवसांपूर्वी एक ट्वीट केले होते. या ट्वीटमध्ये त्याला मदत मागण्यासाठी किती मेसेज येतात हे आपल्याला पाहायला मिळाले होते. या ट्वीटसोबत त्याने कॅप्शन दिले होते की, मी आणि माझी टीम तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण या सगळ्यात कोणता मेसेज आमच्याकडून वाचायचा राहिला असेल तर त्यासाठी आम्हाला माफ करा....

टॅग्स :सोनू सूद