‘रेस ३’मध्ये लागू शकते हृतिकची वर्णी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2016 11:01 IST
अब्बास-मस्तान दिग्दर्शित अॅक्शन सिरीज ‘रेस’चा तिसार भाग पुढील वर्षी येणारा आहे. पहिल्या दोन चित्रपटांत सैफ अली खान प्रमुख भूमिकेत ...
‘रेस ३’मध्ये लागू शकते हृतिकची वर्णी
अब्बास-मस्तान दिग्दर्शित अॅक्शन सिरीज ‘रेस’चा तिसार भाग पुढील वर्षी येणारा आहे. पहिल्या दोन चित्रपटांत सैफ अली खान प्रमुख भूमिकेत होता. मात्र ‘रेस २’ला मिळालेल्या संमिश्र प्रतिसादामुळे तो ‘रेस ३’मध्ये काम करण्यास फारसा उत्सुक नसल्याचे कळतेय. त्यामुळे दिग्दर्शक-निर्मात्यांनी त्याच्या जागी दुसऱ्या हीरोचा शोध सुरू केला आहे.आधी सलमान खानचे नाव चर्चेत होते. स्वत: अब्बास-मस्तान यांनी त्यांच्याशी बोलणी सुरू असल्याचे सांगितले होते. पण ‘दबंग’ खान सध्या कबीर खानच्या ऐतिहासिक युद्धपट ‘ट्यूबलाईट’ आणि ‘बिग बॉस १०’च्या शूर्टींगमध्ये व्यस्त आहे. त्यानंतर तो ‘एक था टायगर’चा सिक्वेल ‘टायगर जिंदा है’चे चित्रिकरण सुरू करणार आहे. म्हणजे २०१७मध्ये तो ‘रेस ३’साठी वेळ देऊ शकत नाही.सलमाननंतर आता हृतिक रोशनचे नाव समोर येत आहे. जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या ‘काबील’नंतर हृतिककडे ‘क्रिश ४’चा प्रोजेक्ट आहे. परंतु त्याच्या शूटींगसाठी काही महिन्यांचा अवकाश असल्यामुळे कदाचित त्याला ‘रेस ३’साठी डेट देणं शक्य आहे. तारखांचा मेळ घालण्यासाठी सध्या त्यांच्यामध्ये बोलणी करीत असून सर्व जुळून आल्यास ‘रेस ३’मध्ये हृतिकची वर्णी लागू शकते. रेस २२००८ साली पहिला ‘रेस’ चित्रपट आला होता. सैफ बरोबरच अनिल कपूर, अक्षय खन्ना, कॅटरिना कैफ आणि बिपाशा बसू अशी त्यामध्ये स्टारकास्ट होती. ‘रेस २’मध्ये दीपिका, जॅकलिन आणि जॉन यांची एन्ट्री झाली. ‘रेस ३’मध्ये अनिल कपूर परतणार का यावर मात्र अद्याप प्रश्नचिन्ह आहे.‘मोहेंजोदडो’च्या अपयशानंतर हृतिकला यामी गौतम को-स्टारर ‘काबील’कडून खूप अपेक्षा आहेत. तसेच ‘रेस’सारखी लोकप्रिय अॅक्शन चित्रपट मालिका त्याच्या करिअरला पुन्हा उभारी देऊ शकते.