Join us

​पुन्हा कशासाठी एकत्र आलेत हृतिक-सुजैन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2016 15:07 IST

हृतिक रोशनचा ‘काबील’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. त्यामुळे हृतिक सध्या प्रचंड बिझी आहे. मात्र इतक्या बिझी शेड्यूलमध्येही हृतिक ...

हृतिक रोशनचा ‘काबील’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. त्यामुळे हृतिक सध्या प्रचंड बिझी आहे. मात्र इतक्या बिझी शेड्यूलमध्येही हृतिक त्याची एक्स वाईफ सुजैन खान हिच्यासोबत दिसला. कायदेशीररित्या दोघेही विभक्त झाले असले तरी मुलांसाठी मात्र हृतिक व सुजैन स्वत:चे मतभेद विसरून एकत्र येतात. काल गुरुवारी सुद्धा हृतिक व सुजैन यांनी मुलांसोबत डिनर डेट एन्जॉय केली. मुंबईच्या एका हॉटेलबाहेर हृतिक व सुजैन एकत्र दिसले.पांढºया रंगाच्या कॅज्युअल लूकमधील हृतिकने हिरव्या रंगाचे जॅकेट घातले होते. तर सुजैनने लाल जीन्स आणि काळ्या रंगाचे टॉपमध्ये होती. हे चौघेही एकाच गाडीतून आलेत आणि एकाच गाडीतून घरी परतले. यापूर्वीही मुलांचे वाढदिवस, त्यांच्या पॅरेन्ट मिटींग अशा अनेक प्रसंगी हृतिक व सुजैन एकत्र आलेत. एकंदर काय तर स्वत:तील मतभेदांचा मुलांवर कुठलाही परिणाम होणार नाही, याची सुजैन आणि हृतिक दोघेही पुरेपूर काळजी घेतात. काही महिन्यांपूर्वी सुजैनने मुलांसोबतचे लंडनमध्ये हॉली डे एन्जॉय करतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. यानंतर  हृतिकने सुजैन व मुलांना जॉईन केल्याची बातमी आली होती. मात्र या बातमीत काहीही तथ्य नसल्याचे खुद्द सुजैनने स्पष्ट केले होते.‘माझ्यालाईफमधील घडामोडींवर मीडिया इतक्या पटकन कसा काय रिअ‍ॅक्ट होतो, याचेच मला आश्चर्य वाटते.  हृतिक, मी व मुलांनी एकत्र हॉलीडे एन्जॉय केला, यात काहीही तथ्य नाहीयं. हृतिक त्यावेळी लंडनमध्ये होता. याचदरम्यान मी सुद्धा मुलांसोबत हॉलीडेचा प्लॅन आखला. हृतिककडून  मुलांना घेतल्यानंतर मी व मुलांनी सुटी एन्जॉय केली. हृतिक आणि मी पालक सर्वात आधी आहोत. पालक या नात्याने येणाºया जबाबदाºया पार पाडण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, हे मी आधीही सांगितले आहेच. अशात हृतिक व मी मुलांसोबत लंच घेतले म्हणजे आम्ही एकत्र हॉली डे एन्जॉय केला, असे होत नाही, असे सुझान म्हणाली होती. लवकरच हृतिकचा ‘काबील’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. यात यामी गौतम हृतिकसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.