Join us

ह्रतिक रोशन दिसणार मराठी चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2017 12:43 IST

हृतिक रोशन मराठीत चित्रपट एक महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटचे दिग्दर्शन विक्रम फडणीस करणार आहे. याचित्रपटाच्या माध्यमातून विक्रम ...

हृतिक रोशन मराठीत चित्रपट एक महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटचे दिग्दर्शन विक्रम फडणीस करणार आहे. याचित्रपटाच्या माध्यमातून विक्रम दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करतोय. या चित्रपटाच्या तारीख ह्रतिकने ट्विटरवरुन जाहीर केली होती. नुकतेच या चित्रपटाचे ट्रेलर लाँच करण्यात आले. यावेळी ह्रतिक रोशनसह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. ह्रतिक म्हणाला,  विक्रम या चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन माझ्या जवळ आला होता. तेव्हा दुसऱ्या एका प्रोजेक्टवर काम करत होतो. विक्रमच्या चित्रपटाची कथा मला ऐकताच आवडली. याचित्रटामुळे मला सुंदर कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. ही संधी मला विक्रमने दिल्यामुळे मी त्याचा आभारी आहे.   विक्रम फडणीस सांगतो, ह्रतिक रोशन माझ्या चित्रपट काम करत असल्याने मला सन्मानित झाल्यासारखे वाटते आहे. त्यांने वेळोवेळी या चित्रपटाबाबतचे अपडेट्स ट्विटरवर टाकत असतो. ह्रतिक रोशनच्या हस्ते चित्रपटाचे ट्रेलर लाँच करणे चित्रपटाच्या टीमसाठी खूपच खास गोष्ट आहे. हा दिवस आमच्या सगळ्यांच्या कायम लक्षात राहिल.  शामक दावर म्हणतो, मी अनेक वर्षांपासून एक क्रिएटीव्ह कलाकार म्हणून विक्रमला ओळखतो. मला आनंद होतोय विक्रम एक पाऊल पुढे टाकत दिग्दर्शन क्षेत्रात उतरला आहे. मराठी नाटकं आणि चित्रपट मला खूप आवडतात. याचित्रपटाच्या माध्यमातून मला पहिल्यांदा मराठी चित्रपटात कोरिओग्राफी करण्याची संधी मिळाली आहे. चित्रपटाचा ट्रेलर बघुन चित्रपट खूपच सुंदर असेल याची पूर्ण कल्पना येते आहे.  7 जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मुक्ता बर्वे, सुबोध भावे आणि सोनाली खरे यांच्या मुख्य भूमिका आहेत.