Join us

Video: चाहत्यासमोर हृतिक झाला नतमस्तक; सगळ्यांसमोर धरले पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2022 10:38 IST

Hrithik roshan: सध्या सोशल मीडियावर हृतिकचा एक व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हृतिकने एका लाइव्ह कार्यक्रमात चक्क चाहत्याचे पाय धरल्याचं पाहायला मिळालं.

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) याची तरुणांमध्ये तुफान क्रेझ असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे तो कुठेही दिसला तरीदेखील चाहते त्याच्याभोवती गर्दी करतात. विशेष म्हणजे कूल लुक आणि फिटनेसमुळे कायम नेटकऱ्यांचं लक्ष वेधणाऱ्या हृतिकने यावेळी त्याच्या एका कृतीमुळे चाहत्यांचं लक्ष आकर्षित केलं आहे. 

सध्या सोशल मीडियावर हृतिकचा एक व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हृतिकने एका लाइव्ह कार्यक्रमात चक्क चाहत्याचे पाय धरल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे त्याच्या या कृतीमुळे त्याने चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत.

अलिकडेच हृतिकने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी एक चाहता स्टेजवर आला आणि त्याने हृतिकचे पाय धरले. परंतु, चाहत्याची ही कृती पाहून हृतिकला कसं तरी वाटलं आणि त्यानेही लगेच चाहत्याचे पाय धरले.  हृतिकच्या स्वभावातील हा साधेपणा पाहून चाहते पुन्हा एकदा त्याच्या प्रेमात पडले. आणि, हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला.

दरम्यान, हृतिक रोशनने सगळ्यांसमोर चाहत्याचे पाय धरले. तो खरंच एक अमूल्य रत्न आहे. त्याच्यासारखं खरंच कोणी नाहीये, असं म्हणून हा व्हिडीओ हृतिकच्या एका चाहत्याने शेअर केला आहे. सध्या हृतिक या व्हिडीओसह त्याच्या विक्रम वेधा या चित्रपटामुळेही चर्चेत येत आहे. या चित्रपटात हृतिकसह अभिनेता सैफ अली खानदेखील स्क्रीन शेअर करणार आहे.

टॅग्स :हृतिक रोशनबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमासैफ अली खान