Join us  

Hrithik Roshan Saba Azad: साऊथ स्टार्सकडून जरा काही शिक..! सबासाठी हृतिकने चाहत्याला ढकललं, नेटकऱ्यांनी सुनावलं...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2022 11:07 AM

Hrithik Roshan Saba Azad: हृतिक-सबा हे कपल अलीकडे सर्रास हातात हात घालून एकत्र फिरताना दिसतं. या दोघांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय आणि यामुळे हृतिक ट्रोल होतोय...

Hrithik Roshan Saba Azad: हृतिक रोशनचा अलीकडे रिलीज झालेला ‘विक्रम वेधा’ बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. पण तरिही हृतिकची चर्चा कमी नाही. सध्या तो चित्रपटांपेक्षा त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. होय, सबा आझादसोबतच्या रिलेशनशिपमुळे तो चर्चेत आला आहे. गेला काही महिन्यांपासून हृतिक अभिनेत्री सबा आझाद हिला डेट करत आहे. हे कपल अलीकडे सर्रास हातात हात घालून एकत्र फिरताना दिसतं. या दोघांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय आणि यामुळे हृतिक ट्रोल होतोय.

हा व्हिडीओ एका रेस्टारंटबाहेरचा आहे. यात हृतिक व सबा रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहेत. व्हिडीओ सबाचा एक्स-बॉयफ्रेन्ड इमाद शाह हा सुद्धा दिसतोय. हृतिक सबाचा एक्स इमादला मिठी मारतो. यानंतर सबाही इमादला मिठी मारून त्याचा निरोप घेते. दोघंही आपल्या गाडीकडे जाऊ लागतात.  हे दोघंजण गाडीकडे जात असताना काही चाहते सबाबरोबर सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतात. पण त्यावेळी हृतिक एका चाहत्याला हाताने तिच्यापासून दूर ढकलतो आणि यानंतर सबा व हृतिक गाडीत बसून निघून जातात. हृतिकने चाहत्याला अशा पद्धतीने दूर ढकलणं नेटकऱ्यांना आवडलं नाही आणि अनेकांनी त्याला फैलावर घेतलं.

हृतिकचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी दोघांना जबरदस्त ट्रोल केलं आहे. ‘या चाहत्यांमुळेच तुम्ही स्टार बनला आहात हे विसरू नका,’ असं एका युजरने लिहिलं आहे. ‘हृतिक लाज बाळग. तू विनम्रपणे त्या चाहत्याला नाही असं सांगू शकला असता. साऊथ स्टार्सच्या मागे चाहते क्रेझी झाले आहेत, ते उगाच नाही. जरा त्यांच्याकडून शिक,’ असं एका युजरने हृतिकला सुनावलं आहे. ‘बॉलिवूडच्या फालतू लोकांना अ‍ॅटिट्यूड आहे,’ अशा शब्दांत एक युजरने आपला संताप व्यक्त केला आहे.  

टॅग्स :हृतिक रोशनबॉलिवूड