Join us  

रणवीर सिंगच्या फॅशन सेन्सच्या प्रेमात पडला हा बॉलिवूडचा अभिनेता, केली अतरंगी फॅशन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 6:43 PM

या अभिनेत्याने ट्विटरवर त्याचा अतरंगी फॅशनचा फोटो पोस्ट करून त्याची प्रेरणा रणवीर सिंग असल्याचे ट्वीटमध्ये म्हटले आहे.

ठळक मुद्देहृतिकने या फोटोत लाल रंगाचा टी शर्ट घातला असून खाली टॉवेल गुंडाळला आहे आणि डोक्यावर काळ्या रंगाची कॅप घातली आहे. त्याने या फोटोसोबत लिहिले आहे की, या फॅशनसाठी माझी प्रेरणा रणवीर सिंग आहे.

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या चित्रीकरणातून वेळ काढून व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे. हृतिक व्हेकेशनसाठी आता दुबईत असून त्याने त्याच्या या ट्रीपचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो हृतिकच्या फॅन्सना प्रचंड आवडत असून या फोटोसोबत त्याने दिलेली कॅप्शन सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

हृतिकने ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोत हृतिकची अतरंगी फॅशन आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याने या फोटोत लाल रंगाचा टी शर्ट घातला असून खाली टॉवेल गुंडाळला आहे आणि डोक्यावर काळ्या रंगाची कॅप घातली आहे. तो या फोटोत बागेत फेरफटका मारताना आपल्याला दिसत आहे. त्याने या फोटोसोबत लिहिले आहे की, या फॅशनसाठी माझी प्रेरणा रणवीर सिंग आहे. 

रणवीर सिंग त्याच्या अभिनयाइतकाच त्याच्या अतरंगी फॅशन सेन्ससाठी ओळखला जातो. तो नेहमीच काही ना काही अतरंगी फॅशन करताना दिसतो. आता हृतिकदेखील त्याच्या फॅशन सेन्सच्या प्रेमात पडला आहे असेच आपल्याला म्हणावे लागेल.

हृतिकने हा फोटो शेअर केल्यानंतर त्यावर अतिशय मजेदार कमेंट येत आहेत. राकेश रोशन रणवीर सिंगला म्हणतो की, तुम्हाला विनंती आहे माझ्या मुलापासून दूर राहा असे एकाने थ्री इडियट मधील फोटो पोस्ट करत कमेंट केले आहे.

तर तू कोणत्या लाईनमध्ये आलास असे एकजण त्याला सोशल मीडियाद्वारे विचारत आहे.

एकाने तर चक्क कोरोनापेक्षा देखील रणवीर व्हायरल भयानक असल्याचे म्हटले आहे. 

बॉलिवूडचा ग्रीक गॉड हृतिक रोशनने गेल्यावर्षी ‘सुपर 30’ आणि ‘वॉर’ या सुपरहिट सिनेमांसह बॉक्स ऑफिसवर धमाकेदार वापसी केली. त्याआधी दीर्घकाळ हृतिक रूपेरी पडद्यापासून दूर होता. ‘सुपर 30’ आणि ‘वॉर’ हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. आता संजय लीला भन्साळी, आनंद राय, फराह खान, आदित्य चोप्रा, करण जोहर आणि साजिद नाडियाडवाला यांच्यासह देशातील जवळजवळ प्रत्येक मोठ्या चित्रपट निर्मात्याची हृतिक पहिली चॉईस ठरला आहे.

टॅग्स :रणवीर सिंगहृतिक रोशन