Join us  

हृतिक रोशन बालपणी कसा करत होता अभिनय आणि डान्स, बघा थ्रोबॅक VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 4:53 PM

हृतिक रोशन (Hrithik Roshan Video) च्या याच सिनेमातील एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. ज्यात तो क्यूट अंदाजात अॅक्टिंग आणि डान्स करताना दिसत आहे.

बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन (Hrithik Roshan) बालपणापासूनच अॅक्टिंग आणि डन्सिंगमध्ये तरबेज आहे. 'कहो ना प्यार है' या सिनेमातून त्याने मुख्य अभिनेता म्हणून एन्ट्री घेतली असली तरी त्याने १९८६ मध्ये आलेल्या 'भगवान दादा' सिनेमातही बाल कलाकरा म्हणून काम केलं होतं. हृतिक रोशन (Hrithik Roshan Video) च्या याच सिनेमातील एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. ज्यात तो क्यूट अंदाजात अॅक्टिंग आणि डान्स करताना दिसत आहे.

व्हिडीओत बघू शकता की, हृतिक रोशन (Hrithik Roshan) अभिनेत्री श्रीदेवीसोबत सीन करत आहे. त्यासोबतच याच सिनेमात तो साउथचा सुपरस्टार रजनीकांतसोबत आणि वडील राकेश रोशनसोबतही दिसत आहे. बालपणीही त्याची अॅक्टिंग सहज आणि शानदार होती. 

हृतिक रोशनच्या सध्याच्या कामाबाबत सांगायचं तर त्याने नुकतीच 'फायटर' सिनेमाची घोषणा केली होती. या सिनेमात तो अभिनेत्री दीपिका पादुकोनसोबत दिसणार आहे. तर या सिनेमाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार आहे. त्यासोबतच क्रिश-४ हा सिनेमा सुद्धा येणार आहे.  तसेच हृतिक विक्रम वेधाच्या रिमेकमध्येही दिसणार असल्याची चर्चा आहे. या सिनेमात सैफ अली खान पोलिसाची भूमिका साकारणार आहे. 

टॅग्स :हृतिक रोशनबॉलिवूडसोशल व्हायरल