Join us

राकेश ओम प्रकाश मेहरांच्या चित्रपटात दिसणार ह्रतिक रोशन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 13:06 IST

ह्रतिक रोशनच्या 'काबिल चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले. 2017मधल्या हिट चित्रपटांपैकी तो एक होता. शाहरुख खानच्या रईसला ही ...

ह्रतिक रोशनच्या 'काबिल चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले. 2017मधल्या हिट चित्रपटांपैकी तो एक होता. शाहरुख खानच्या रईसला ही त्यांने जोरदार टक्कर दिली होती. यात ह्रतिक आणि यामी गौतमची प्रमुख भूमिका होती. ह्रतिकने साकारलेल्या रोहन भटनागरच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले. त्यानंतर ह्रतिकचे चाहते त्याच्या चित्रपटाची वाट आतुरतेने बघता येत. ह्रतिकच्या फॅन्ससाठी आमच्याकडे गुडन्यूज आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार असे कळतेय की ह्रतिक रोशन राकेश ओम प्रकाश मेहरा यांच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे या चित्रपटात तो एका कबड्डी खेळाडूची भूमिका साकारणार आहे.    डीएनएमध्ये आलेल्या बातमीनुसार ह्रतिक रोशन लवकरच खेळावर आधारित चित्रपटात दिसणार आहे. ज्याची निर्मिती रॉनी स्क्रूवाला करणार आहे. यात ह्रतिक एका कबड्डी खेळाडूची भूमिका साकारणार आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश ओम प्रकाश मेहरा करणार आहे. या चित्रपटाचे नाव अजून फायनल झाले नाही. मात्र ही खबर जर पक्की असेल तर पहिल्यांदाच ह्रतिकचा हा राकेश ओम प्रकाश मेहरा यांच्यासोबत पहिलाच चित्रपट असेल.  ALSO READ : जर तुम्ही ‘क्रिश-४’ची प्रतीक्षा करत असाल, तर ही बातमी वाचा!या चित्रपटाव्यतिरिक्त ह्रतिकचे वडील राकेश रोशन यांच्या 'क्रिश4' च्या तयारीला लागला आहे.'क्रिश4'ची स्क्रिप्ट जवळपास तयार झाली आहे. या वर्षाच्या अखेरीस या चित्रपटाची शूटिंग सुरु करण्यात येणार आहे. याचबरोबर ह्रतिक विकास बहलच्या चित्रपटातसुद्धा झळकणार आहे. बिहारमधील ‘सुपर30’ प्रोग्रामचे हेड आनंद कुमार यांची भूमिका साकारणार आहे. आनंद कुमार बिहारात ‘सुपर30’ नावाची एक प्रोग्राम चालवतात. या प्रोग्रामअंतर्गत आनंद कुमार यांनी आत्तापर्यंत अनेक गरिब व होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे.