घटस्फोटानंतरही संपलेले नाही हृतिक रोशन व सुजैन खानचे प्रेम! हा आहे पुरावा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 15:38 IST
हृतिक रोशन व सुजैन खान या दोघांचा म्हणायला घटस्फोट झालायं. पण दोघेही एकत्र येण्याची एकही संधी सोडत नाही. खास ...
घटस्फोटानंतरही संपलेले नाही हृतिक रोशन व सुजैन खानचे प्रेम! हा आहे पुरावा!!
हृतिक रोशन व सुजैन खान या दोघांचा म्हणायला घटस्फोट झालायं. पण दोघेही एकत्र येण्याची एकही संधी सोडत नाही. खास क्षणांना हृतिक व सुजैन दोघेही एकमेकांसोबत असतात. काल हृतिक व सुजैन पुन्हा एकत्र दिसले. निमित्त होते, मुव्ही डेटचे. दोघेही मुलांसोबत सिनेमा पाहायला पोहोचले. यावेळचे दोघांचेही फोटो समोर आले आहेत. यात हृतिकने लाईट ग्रीन फुल स्लीव टी-शर्ट व जीन्स तर सुजैनने पांढरा टॉप व लाईट ब्ल्यू जीन्स कॅरी केला आहे. या फोटोत हृतिक व सुजैन एकमेकांसोबत नेहमीप्रमाणे कम्फर्टेबल दिसताहेत. गत २६ तारखेलाच सुजैनचा वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसाची ग्रॅण्ड पार्टी आयोजित केली गेली होती. या पार्टीतही हृतिक हजर होता. केवळ हजरच नाही तर सुजैनसोबत धम्माल मस्ती करताना तो दिसला होता. ALSO READ: ‘सुपर30’साठी हृतिक रोशन नाही तर ‘हा’ सुपरस्टार होता मेकर्सची ‘फर्स्ट चॉईस’!!हृतिक रोशन व सुजैन खान या दोघांचा घटस्फोट झालाय. पण दोघांमधीलही मैत्री अद्याप संपलेली नाही. घटस्फोटानंतरही दोघेही अनेकदा एकत्र दिसतात. हृतिकच्या घरच्या प्रत्येक कार्यक्रमात सुजैन आवर्जून हजेरी लावली. दोघेही मुलांसोबत हॉली डे एन्जॉय करतात. खरे तर हृतिक व सुजैन यांच्या घटस्फोटानंतर अनेक चर्चा रंगल्या. या घटस्फोटामागचे कारण काय, यानिमित्ताने नाही नाही ते बोलले गेले. पण याऊपरही अटीतटीच्या वेळी एक्स वाईफ सुजैन हृतिकच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभी राहत आलीय. अलीकडे हृतिक व कंगना राणौत या दोघांच्या वादातही सुजैने हृतिकला खंबीर पाठींबा देताना दिसली.चर्चा खरी मानाल तर, सुजैन हिनेच हृतिकला आपली बाजू मांडण्याचा सल्ला दिला. कंगनाचे सगळे आरोप खोटे आहेत, यावर सुजैनचा पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळे तिनेच आपल्या एक्स-हसबण्डला याप्रकरणी लोकांसमोर येण्यासाठी राजी दिले. मी तुझ्या पाठीशी आहे. सगळ्या आरोपांना खंबीरपणे सामोरे जा, असे सुजैनने हृतिकला सांगितल्याचे कळते. गत जानेवारीत हृतिकचा ‘काबील’ हा सिनेमा रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली होती. लवकरच हृतिक ‘सुपर30’ फेम आनंद कुमार यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे.