Join us

हृतिकने मांडला आपला जीवनप्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 16:59 IST

अभिनेता हृतिक रोशनच्या अनुसार तो व्यक्ती म्हणून सर्वत्र सहभागी असतो. आयुष्यातील चढउतारापेक्षा तो अजूनही लढतो आहे, हे त्याच्यासाठी महत्वाचे ...

अभिनेता हृतिक रोशनच्या अनुसार तो व्यक्ती म्हणून सर्वत्र सहभागी असतो. आयुष्यातील चढउतारापेक्षा तो अजूनही लढतो आहे, हे त्याच्यासाठी महत्वाचे आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत हृतिकने आपला जीवनप्रवास मांडला. कंगना राणावतसोबतच्या सुरु असलेल्या कायदेशीर लढाईनंतर त्याला अभिनेता म्हणून आयुष्यातील चढउताराबाबत विचारले असता त्याने या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. तथापि प्रत्येकाला आपल्या आयुष्यात नवीन काही तरी हवे असते. त्याला स्थितीनुसार आणि वेळेनुसार बदलावे लागते असे तो म्हणाला. त्याची कार्यक्षमता पुन्हा स्वत:ला सिद्ध करते. नव्या भूमिकेत तो स्वत:ची प्रतिमा अधिक चांगल्या पद्धतीने करतोय. आपण त्याला अगदी फिट्ट बसतो. अनेक वरिष्ठ अभिनेते चुकीचा ब्रँड निवडल्याबद्दल टीकेला सामोरे जात असताना केवळ त्याला जे चांगले वाटते, तेच करतो असे त्याचे म्हणणे आहे.अत्यंत भरवसा असणारे, विश्वासू आणि योग्य असे कंपनीचे उत्पादन निवडण्याबाबत माझा कटाक्ष असतो. ग्राहकांवर त्याचा चांगला परिणाम व्हावा, त्याचप्रमाणे लोकांना आणि संबंधित कंपनीला फायदा व्हावा अशांसोबत मी काम करतो, असे हृतिक म्हणाला.सध्या मी शुटींगमध्ये अत्यंत व्यस्त आहे. वेळेवर येणे आणि आपल्या व्यवसायाशी प्रामणिक राहण्याला माझे प्राधान्य असल्याचे हृतिकने सांगितले.२०१४ साली त्याचा बँग बँग हा चित्रपट आला होता. येत्या १२ आॅगस्ट रोजी आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘मोहनजोदडो’ हा त्याचा चित्रपट येतोय. जानेवारीमध्ये त्याचा ‘काबील’ हा चित्रपट येईल.