हृतिक व सुझान एकत्र हॉलीडेवर...सुझान म्हणते हे खोटे!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 17:44 IST
काही दिवसांपूर्वी सुझान खान हिने मुलांसोबतचे लंडनमध्ये हॉली डे एन्जॉय करतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. यानंतर बातमी ...
हृतिक व सुझान एकत्र हॉलीडेवर...सुझान म्हणते हे खोटे!!
काही दिवसांपूर्वी सुझान खान हिने मुलांसोबतचे लंडनमध्ये हॉली डे एन्जॉय करतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. यानंतर बातमी आली ती, हृतिक रोशन सुझान व मुलांना जॉईन केले याची. पण या बातमीत काहीही तथ्य नसल्याचे खुद्द सुझानने स्पष्ट केले आहे. होय, एका आॅनलाईन पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सुझानने या बातमीवर खुलासा केला. माझ्या लाईफमधील घडामोडींवर मीडिया इतक्या पटकन कसा काय रिअॅक्ट होतो, याचेच मला आश्चर्य वाटते. हृतिक, मी व मुलांनी एकत्र हॉलीडे एन्जॉय केला, यात काहीही तथ्य नाहीयं. हृतिक त्यावेळी लंडनमध्ये होता. याचदरम्यान मी सुद्धा मुलांसोबत हॉलीडेचा प्लॅन आखला. हृतिककडून मुलांना घेतल्यानंतर मी व मुलांनी सुटी एन्जॉय केली. हृतिक आणि मी पालक आहोत. पालक या नात्याने येणाºया जबाबदाºया पार पाडण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, हे मी आधीही सांगितले आहेच. अशात हृतिक व मी मुलांसोबत लंच घेतले म्हणजे आम्ही एकत्र हॉली डे एन्जॉय केला, असे होत नाही, असे सुझान म्हणाली.