Join us

'महिन्याला किती कमवतोस ?',चाहत्यानं विचारली 'पठान'ला कमाई, शाहरुख खान म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 12:11 IST

Shah Rukh Khan : शाहरुख खानने तिसऱ्यांदा ट्विटरवर 'आस्क मी एनीथिंग' सेशन केले. या सत्रात चाहत्यांनी शाहरुखला विविध प्रश्न विचारले, ज्यांची किंग खाननेही मजेशीर उत्तरे दिली.

सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या 'पठाण' (Pathaan Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. लवकरच हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील दीपिका पादुकोणवर चित्रित केलेल्या 'बेशरम रंग' या गाण्यावरून बराच वाद झाला होता. चित्रपटाबाबत वाद सुरू झाल्यापासून शाहरुख सतत त्याच्या चाहत्यांशी संवाद साधतो आहे. अलीकडेच, शाहरुखने बुधवारी तिसऱ्यांदा ट्विटरवर 'आस्क मी एनीथिंग' सेशन केले.

या सत्रात चाहत्यांनी शाहरुखला विविध प्रश्न विचारले, ज्यांची किंग खाननेही मजेशीर उत्तरे दिली. असाच एक प्रश्न एका युजरने शाहरुखला त्याच्या महिन्याच्या कमाईबद्दल विचारले आणि अभिनेत्याने त्याचे उत्तर दिले. त्याचे हे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

आस्क मी एनीथिंग सेशनमध्ये एका यूजरने शाहरुख खानला विचारले, 'तुम्ही एका महिन्यात किती कमावता?'. ज्याला अभिनेत्याने उत्तर दिले, 'मी रोज प्रेम कमावतो'. अभिनेत्याच्या या उत्तराने लोकांची मने जिंकली आणि आता तो शाहरुखचे कौतुक करण्यापासून रोखू शकला नाही. त्याचवेळी या सेशनमध्ये एका यूजरने शाहरुखला विचारले की, तो त्याच्या नावाच्या मागे खान का लावतो? त्याला उत्तर देताना तो म्हणाले, 'संपूर्ण जग हे माझे कुटुंब आहे. कुटुंबाच्या नावाने नाव होत नाही, काम नाव बनवते. कृपया छोट्या छोट्या गोष्टीत पडू नका.

यापूर्वी अशी बातमी होती की शाहरुख-दीपिकाचा चित्रपट १० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे, परंतु लेटेस्ट रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट २५ जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात जॉन अब्राहमही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच 'बेशरम रंग' नंतर 'झूम जो पठान' चित्रपटाचे दुसरे गाणे रिलीज झाले, ज्यामध्ये शाहरुख आणि दीपिका यांच्यातील धमाकेदार केमिस्ट्री पाहायला मिळाली. या चित्रपटात शाहरुख रॉ एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे.

टॅग्स :शाहरुख खानपठाण सिनेमा