Join us  

ऐश्वर्या राय बच्चनचा हात कसा फ्रॅक्चर झाला? कान्समधून परतल्यानंतर अभिनेत्रीने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 5:49 PM

Aishwarya Rai Bachchan : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन नुकतीच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी तिच्या हाताला प्लास्टर पाहून तिच्या चाहत्यांना काळजी वाटू लागली.

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. अभिनेत्री प्रत्येक वेळी तिच्या लूकने चाहत्यांना प्रभावित करते. मात्र यावेळी ऐश्वर्याला पाहून तिचे चाहते चिंतेत पडले आहेत. नुकतीच अभिनेत्री कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी ऐश्वर्याच्या हाताला प्लास्टर पाहून तिच्या चाहत्यांना काळजी वाटू लागली. मुलगी आराध्याही ऐश्वर्यासोबत चित्रपट महोत्सवात गेली होती. आराध्या तिच्या आईसोबत होती आणि तिची काळजी घेताना दिसली. ऐश्वर्याने आतापर्यंत तिच्या दुखापतीवर मौन बाळगले आहे. ही दुखापत कशामुळे झाली ही तिने सांगितलेले नाही.

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या हातावर प्लास्टरर बांधून फिरताना दिसली. कान्सनंतर ऐश्वर्या भारतात परतली आहे आणि जेव्हा ती मतदान करायला गेली तेव्हाही तिच्या हाताला प्लास्टर होते. आता तिच्या हाताला दुखापत कशी झाली, याची माहिती समोर आली आहे. मिड डेच्या रिपोर्टनुसार, ऐश्वर्या ११ मे रोजी जखमी झाली होती. तिच्या मनगटाला दुखापत झाली आहे. ती तिच्या मुंबईतील घरात पडली, ज्यामुळे तिला दुखापत झाली.

हाताला दुखापत झाल्यानंतरही ऐश्वर्या कामापासून मागे हटली नाही. तिने ठरवले होते की तिच्या मनगटातील सूज कमी झाल्यानंतर ती तिच्या सर्व कामाच्या कमिटमेंट्स पूर्ण करेल. दुखापतीनंतर अवघ्या दोन दिवसांतच ऐश्वर्याने तिच्या डिझायनरसोबत कॉस्च्युम फिटिंग केला होता. तिने तिच्या हाताला परत दुखापत होणार नाही, अशा पद्धतीचा आउटफिट बनवून घेतला होता. वेदना होत असतानाही ऐश्वर्याने तिच्या कामाच्या कमिटमेंट्स पूर्ण केल्या.

कान्सचा लूक व्हायरल झाला होताऐश्वर्याचा कान्समधील लूक व्हायरल होत आहे. दोन्ही ड्रेसमध्ये ती खूपच क्यूट दिसत होती. हातावर प्लास्टर असूनही तिच्या चेहऱ्यावर वेदनेचे भाव नव्हते. तिने पापाराझींसमोर पोजही दिला.

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चन