Join us  

Housefull 4 Trailer : हा ट्रेलर पाहून तुम्ही खळखळून हसणार यात काहीच शंका नाही, पाहा हा मजेदार ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 7:43 PM

हाऊसफुल 4 चा ट्रेलर हा तीन मिनिटे 36 सेकंदाचा हा ट्रेलर प्रेक्षकांना खळखळून हसवतो.

ठळक मुद्देअक्षयचा एक वेगळाच अंदाज या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तर रितेश देशमुख एका कथ्थक शिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. रितेशच्या आजवरच्या कारकिर्दीतील ही एक वेगळी भूमिका आहे.

साजिद नाडियाडवालाच्या हाऊसफुल 4 या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहात आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार, क्रीती सॅनन, बॉबी देओल, पूजा हेगडे, क्रीती खरबंदा आणि रितेश देशमुख यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून हा ट्रेलर प्रेक्षकांना चांगलाच आवडत आहे. यात 1419 आणि 2019 असे दोन काळ आपल्याला पाहायला मिळत आहेत. 

हाऊसफुल 4 चा ट्रेलर हा तीन मिनिटे 36 सेकंदाचा हा ट्रेलर प्रेक्षकांना खळखळून हसवतो. या ट्रेलरची सुरुवात 1419 काळातील व्यक्तिरेखांपासून होते. आपल्याला अक्षय, रितेश, बॉबी सगळेच एखाद्या राजाच्या वेशात पाहायला मिळतात. त्यानंतर आताचा काळ पाहायला मिळत असून रितेश आणि अक्षय लंडनमध्ये असलेले पाहायला मिळत आहेत. या चित्रपटाचा सेट अतिशय भव्य असून सगळ्यांच्या रंगभूषा, वेशभषा खूप चांगल्याप्रकारे झाल्या आहेत. अक्षयचा एक वेगळाच अंदाज या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तर रितेश देशमुख एका कथ्थक शिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. रितेशच्या आजवरच्या कारकिर्दीतील ही एक वेगळी भूमिका असल्याचे आपल्याला हा ट्रेलर पाहून कळत आहे तर बॉबी अँग्री मॅनच्या भूमिकेत दिसत आहे. त्याला पाहून तुम्हाला नक्कीच त्याचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची आठवण येईल. तसेच या चित्रपटाची सिनेमेट्रॉग्रोफीदेखील चांगली झाली असल्याचे हा ट्रेलर पाहून लक्षात येते. 

चंकी पांडे, जॉनी लिव्हर, राणा दुग्गबती, सौरभ शुक्ला देखील प्रेक्षकांना खळखळून हसवताना दिसत आहेत. तसेच बाहुबली, पद्मावत, बाजीराव मस्तानी, किक, नो एंट्री यांसारख्या अनेक चित्रपटांचा संदर्भ देखील आपल्याला यात पाहायला मिळत आहे. 

अक्षय कुमारच्या फॅन्ससाठी हा चित्रपट म्हणजे पर्वणी ठरणार आहे. कारण अक्षय तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा कॉमेडी करणार आहे. हा चित्रपट दिवाळीत 26 ऑक्टोबर 2019 ला प्रदर्शित होणार आहे. त्याच दिवशी राजकुमार रावचा मेड इन चायना आणि तापसी पन्नू, भूमी पेडणेकरचा साँड की आँख देखील प्रदर्शित होणार आहे.  

टॅग्स :हाउसफुल 4अक्षय कुमाररितेश देशमुखबॉबी देओलक्रिती सनॉन