Join us  

HOTNESS ALERT:  साऊथच्या या बोल्ड आयटम गर्लपुढे मलायका,सनीसुद्धा पडतील फिक्या!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 12:39 PM

बॉलिवूडमध्ये अनेक बोल्ड नट्या आहेत.  पण साऊथच्या या बोल्ड नटीपुढे बॉलिवूडच्या सगळ्याच नट्या फिक्या पडतील.

ठळक मुद्देमुमैत तिच्या डान्ससाठी ओळखली जाते. याचमुळे ‘झलक दिखला जा’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये ती दिसली होती.

बॉलिवूडमध्ये अनेक बोल्ड नट्या आहेत.  पण साऊथच्या या बोल्ड नटीपुढे बॉलिवूडच्या सगळ्याच नट्या फिक्या पडतील. अगदी मलायका अरोरा, सनी लिओनी या सुद्धा हिच्यापुढे काही नाहीत. साऊथच्या या सर्वात बोल्ड आयटम गर्लचे नाव आहे, मुमैत खान. अख्खी साऊथ इंडस्ट्रीत मुमैतच्या बोल्ड अदांची ‘दिवानी’ आहे. विश्वास बसत नसेल तर तुम्ही हे फोटो पाहू शकता.

1 सप्टेंबर 1985 रोजी जन्मलेल्या मुमैतचे वडिल पाकिस्तानी होते आणि आई चेन्नईची राहणारी होती. बॉलिवूडमध्येही मुमैतने काम केले आहे. तेलगू, हिंदी, तामिळ, कन्नड अशा अनेक सिनेमांत मुमैत झळकली.

मुमैत तिच्या डान्ससाठी ओळखली जाते. याचमुळे ‘झलक दिखला जा’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये ती दिसली होती. बिग बॉस तेलगूमध्येही ती सहभागी झाली होती. या शोचे विजेतेपद तिला मिळवता आले नाही. पण या घरातील तिचे वास्तव्य चर्चेत राहिले होते.

मुमैतला बॉलिवूडचे चाहते भलेही ओळखत नसतील. पण ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा सिनेमा पाहिला असेल तर तिचा चेहरा तुम्हाला आठवेल. या चित्रपटात मुमैत एक आयटम सॉन्ग करताना दिसली होती.

मध्यंतरी ड्रग्ज प्रकरणात तिचे नाव समोर आले होते. मुमैतला काही काळापूर्वी एक अपघात झाला होता. या अपघातानंतर ती 15 दिवस कोमात होती. या दुखापतीतून बाहेर पडल्यानंतर तिने ‘हेजा’ या तेलगू चित्रपटातून वापसी केली होती.

टॅग्स :Tollywoodसनी लिओनी