Join us  

बाबो, अभिनेत्रीला पाहताच चाहत्याने मारुन फेकला होता बूट, त्यादिवसापासून गर्दी पाहताच उडतो तिचा थरकाप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 11:24 AM

अभिनेत्रीच्या अवतोभावती फॅन्सचा गराडा असल्यामुळे तो बूट तिला न लागता एका कर्मचाऱ्याला लागला. 

सेलिब्रिटींवर फॅन्स जीव ओवाळून टाकतात.आवडत्या कलाकाराची एक झलक पाहता यावी यासाठी विविध गोष्टी करताना दिसतात. मात्र प्रत्येक सेलिब्रेटींचे आज लाखो चाहते आहेत.  काही अतिउत्साही फॅन्स याचा गैरवापर करत सेलिब्रिटींना कशाप्रकारे त्रास देतात हे आपण पाहिले आहे. अशाच एका फॅननं साऱ्या सीमा पार करत अभिनेत्री तमन्ना भाटीयावर चाहत्याने बूट फेकल्याचा प्रकार समोर आला होता. 

तमन्नाचा सिनेमा न आवडल्यामुळे हैदराबादमधील या चाहत्याने थेट तिच्यावर बूट भिरकवला होता. तमन्ना हैदराबादच्या हिमायतनगरमध्ये एका ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेली होती. त्यावेळी 31 वर्षीय करिमुल्लाने दुकानातून बाहेर येणाऱ्या तमन्नावर बूट फेकला. तमन्नाभोवती फॅन्सचा गराडा असल्यामुळे तो बूट एका कर्मचाऱ्याला लागला. 

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्यादरम्यान त्याने सांगितले होते की, गेल्या काही दिवसात तमन्नाचे सिनेमे पाहून आपली घोर निराशा झाली, तिचा अभिनय आपल्यास पसंतीस पडला नाही, म्हणून हे पाऊल उचलल्याचं त्याने सांगितले होते. बूट लागलेल्या कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर माथेफिरु चाहत्यावर गुन्हा नोंदवण्यात आला  होता . विशेष म्हणजे हा चाहता मुशिराबादचा रहिवासी असून त्याचे बीटेकपर्यंत शिक्षण झाले आहे.

तमन्ना साऊथ सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. साऊथ इंडियन दिग्दर्शकांसोबत काम करण्यापूर्वी तमन्नाने वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी ‘चांद सा रोशन चेहरा’ या बॉलिवूड सिनेमातून अॅक्टिंग डेब्यू केले होते. 2005 मध्ये तिने 'श्री' या सिनेमातून तेलगू सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. याचवर्षी तिचा ‘केडी’ हा सिनेमासुद्धा रिलीज झाला होता.

 

एकामागून एक अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे देणारी तमन्ना आता बॉलिवूड आणि साऊथ सिनेसृष्टीतील नावाजलेले नाव ठरले आहे. केवळ पडद्यावरच नव्हे तर खासगी आयुष्यातसुद्धा तमन्ना एखाद्या राजकुमारीसारखे आयुष्य जगते.तमन्नाचे वडिल हे हिरे व्यापारी आहेत. यावरुन तमन्नाच्या लाइफस्टाइलचा तुम्हाला अंदाजही आलाच असले इतके राजेसाही थाट तिचा असतो.

टॅग्स :तमन्ना भाटियाबाहुबली