Join us  

अनंत अंबानीच्या लग्नासाठी हॉलिवूड स्टार रिहानाही दाखल, ट्रकभर सामान बघून चक्रावतील डोळे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 3:54 PM

रिहाना हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका आहे. विमानतळावरील कडक सुरक्षाव्यवस्थेत ती जामनगर येथे दाखल झाली.

Anant Ambani Wedding: भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) लग्नबंधनात अडकणार आहे. गुजरातच्या जामनगर येथे त्याचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. राधिका मर्चंटसोबत तो विवाहबद्ध होत आहे. गेल्या काही दिवसांपासूनच या ग्रँड वेडिंगची चर्चा आहे. बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमधूनही काही पाहुणे विवाहसोहळ्यासाठी जामनगरमध्ये दाखल झाले आहेत. ग्लोबल स्टार गायिका रिहाना सुद्धा अनंत अंबानीच्या लग्नात परफॉर्म करणार आहे. तिचे सहकारी जामनगरमध्ये दाखल झाले आहेत तसंच तिचं सामान बघून सर्वच चक्रावले आहेत. 

जामनगर हे धीरुभाई अंबानी यांचं जन्मस्थळ आहे. तर मुकेश अंबानी यांची ही कर्मभूमी आहे. यामुळेच अनंत अंबानीच्या लग्नाची जागा हीच निवडण्यात आली. १ ते ३ मार्च प्री वेडिंग फंक्शन्स असणार आहे. यासाठी बॉलिवूड, हॉलिवूडचे सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भटपासून ते हॉलिवूडमधून रिहाना सुद्धा दाखल झाली आहे. रिहानाचा लग्नसोहळ्यात विशेष परफॉर्मन्स असणार आहे. यावेळी विमानतळावरील तिचं भलंमोठं ट्रकभर सामान बघून अनेकांचे डोळे चक्रावले आहेत. मोठमोठ्या कंटेनर्समध्ये रिहानाचं सामान पॅक करण्यात आलं आहे. हे सामान उतरवण्यासाठी अक्षरश: कॅरियरही आणण्यात आलं. कारण एक नाही तर तीन ट्रकमध्ये मावेल एवढं ते सामान होतं. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

रिहानाचं हे सामान बघून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. रिहाना कायमची जामनगरमध्ये स्थायिक होणार आहे का असा मजेशीर प्रश्नही नेटकऱ्यांनी विचारला आहे. तर काही जणांनी विचारलं की रिहाना काय लग्नापर्यंत भारतातच थांबणार आहे का? 

रिहाना जामनगर येथे पोहोचली तेव्हा तिच्यासाठी कडक सुरक्षाव्यवस्था तैनात होती. तिला घेण्यासाठी तब्बल १० गाड्या पोहोचल्या होत्या. गाड्यांची रांगच विमानतळाबाहेर लागली होती. 

टॅग्स :रिहानालग्नजामनगरगुजरातमुकेश अंबानी