Join us

हॉलिवूड चित्रपटाला बॉलिवूड डान्सचा तडका! दीपिका पादुकोण करणार ‘लुंगी डान्स’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 09:48 IST

दीपिका पादुकोण हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, बॉलिवूडमध्ये अनेक गाण्यांवर थिरकणारी दीपिका आता हॉलिवूड चित्रपटातही डान्सचा तडका ...

दीपिका पादुकोण हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, बॉलिवूडमध्ये अनेक गाण्यांवर थिरकणारी दीपिका आता हॉलिवूड चित्रपटातही डान्सचा तडका लावणार आहे. ‘ट्रिपल एक्स: रिटर्न आॅफ जेंडर केज’चे दिग्दर्शक डी जे कारूसो यांनी याचा खुलासा केला आहे. म्हणजेच आपली डीपी हॉलिवूड चित्रपटात बॉलिवूड डान्स नंबर करताना दिसणार आहे. कारूसो यांनी गतवर्षीच ‘ट्रिपल एक्स’च्या आगामी सीरिजमध्ये दीपिका असणार, हे जाहीर केले होते. या सीरिजमध्ये दीपिकाचा डान्स नंबर असणार आहे. कारूसो यांनी याबद्दल एक ट्विट केले आहे.‘ट्रिपल एक्स4’चा शेवट एका बॉलिवूड डान्स नंबरने करू इच्छितो. निश्चितपणे त्यात दीपिका असेल. हा लुंगी डान्स असेल की काही वेगळे?, असे ट्विट त्यांनी केले आहे.कारूसो यांच्या या ट्विटवरून एक गोष्ट पाण्यासारखी स्वच्छ झाली आहे, ती म्हणजे दीपिकाच्या हाती ‘ट्रिपल एक्स4’च्या रूपात दुसरा हॉलिवूडपट लागला आहे. या सीरिजच्या तिस-या भागात दीपिका दिसली होती. आता चौथ्या भागातही तिची वर्णी लागणार आहे. ती सुद्धा एका स्पेशल बॉलिवूड नंबरसह. यासाठी दीपिका काल-परवाच न्यूयॉर्क रवाना झाली आहे. तूर्तास दीपिकाच्या लग्नाची चर्चाही जोरावर आहे़ बॉयफ्रेन्ड रणवीर सिंगसोबत दीपिका लवकरच लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा आहे. या लग्नासाठी १९ नोव्हेंबरचा मुहूर्त ठरला असल्याचेही कानावर येत आहे. पण निश्चितपणे त्याआधी दीपिकाच्या हॉलिवूडमधील बॉलिवूड डान्स नंबरची प्रतीक्षा असेल.‘ट्रिपल एक्स: रिटर्न आॅफ जेंडर केज3’ या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि विन डिझेलची जोडी दिसली होती. या चित्रपटानंतर विन जणू दीपिकाच्या पे्रमात पडला होता. दीपिका असेल तर मी बॉलिवूडच्या चित्रपटातही काम करायला तयार आहे, असे विन म्हणाला होता.   ALSO READ : दीपिका पादुकोणने परिधान केलेल्या ‘या’ विंटेज कोटची किंमत जाणून तुम्हाला धक्का बसेल!‘ट्रिपल एक्स: रिटर्न आॅफ जेंडर केज3’मध्ये दीपिकाने सेरेना उंगरची व्यक्तिरेखा साकारली होती.  या चित्रपटाने फार मोठी कमाई केली नव्हती. पण यातील दीपिकाच्या कामाचे मात्र प्रचंड कौतुक झाले होते. केवळ दीपिकाचीच नाही तर चित्रपटातील संपूर्ण स्टारकास्टच्या कामाची प्रशंसा झाली होती. त्यामुळे ‘ट्रिपल एक्स: रिटर्न आॅफ जेंडर केज’च्या सीक्वलमध्येही संपूर्ण स्टारकास्ट रिपीट करण्यात येणार आहे.