Join us  

सलमान-आलियाच्या ‘इंशाअल्लाह’चे ज्यूलिया रॉबर्टशी आहे कनेक्शन, जाणून घ्या कसे?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 1:02 PM

‘इंशाअल्लाह’ या चित्रपटात आलिया भट प्रथमच सलमानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. आता सलमान व आलियाच्या या चित्रपटाबद्दल  एक ताजी बातमी आहे. होय, ‘इंशाअल्लाह’चे हॉलिवूड कनेक्शन समोर आले आहे.

ठळक मुद्दे भन्साळी यांच्या सिनेमात ज्युलियाची जागा आलिया घेणार आहे. अर्थात ती एका स्ट्रगलर हिरोईनची भूमिका साकारणार आहे.

संजय लीला भन्साळींच्या ‘इंशाअल्लाह’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाची घोषणा झालीय. पण सलमान खान ‘दबंग 3’मध्ये बिझी आहे. हा चित्रपट पूर्ण झाल्यावरच सलमान ‘इंशाअल्लाह’चे शूटींग सुरु करणार आहे. या चित्रपटात आलिया भट प्रथमच सलमानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. आता सलमान व आलियाच्या या चित्रपटाबद्दल  एक ताजी बातमी आहे. होय, ‘इंशाअल्लाह’चे हॉलिवूड कनेक्शन समोर आले आहे.

बॉलिवूडचे अनेक सिनेमे हॉलिवूड चित्रपटांवर बेतलेले आहेत. भन्साळींचा ‘इंशाअल्लाह’ हा आगामी सिनेमाही एका हॉलिवूडपटावर बेतलेला असल्याचे कळतेय. 1990 मध्ये रिलीज झालेल्या  ‘प्रीटी वूमेन’ या हॉलिवूडच्या चित्रपटावर ‘इंशाअल्लाह’ बेतलेला असल्याचे मानले जात आहे. ‘प्रीटी वूमेन’  या सिनेमात रिचर्ड गेरे आणि ज्यूलिया रॉबर्ट यांच्या महत्त्वाच्या भूमिका होते.

हा हॉलिवूडमधील ऑल टाइम बेस्ट रोमँटिक सिनेमा म्हणून ओळखला जातो. या सिनेमात ज्यूलियाने एका तरुण वेश्येची भूमिका साकारली होती. नंतर ती एका श्रीमंत बिझनेसमनच्या प्रेमात पडते, असे याचे कथानक होते.  भन्साळी यांच्या सिनेमात ज्युलियाची जागा आलिया घेणार आहे. अर्थात ती एका स्ट्रगलर हिरोईनची भूमिका साकारणार आहे. सलमान खान तिला डेटसाठी बोलवतो आणि मग तो तिच्या प्रेमात पडतो, असे याचे कथानक असेल.‘इंशाअल्लाह’ची घोषणा अगदी वाजतगाजत झाली होती. हा चित्रपट 2020मध्ये ईदच्या मुहूर्तावर रिलीज होईल, असेही सांगितले गेले होते. भारतीय सिनेप्रेमींसाठी ईदचा अर्थच सलमान खान असा होतो. यातच भन्साळींचा सिनेमा म्हटल्यावर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पण आता हा चित्रपट ईद 2020 ला रिलीज होणार नाही. चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. सलमानने खुद्द याची माहिती दिली आहे.

टॅग्स :सलमान खानआलिया भटसंजय लीला भन्साळीहॉलिवूड