Join us  

हिंदी डब साउथ चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 9:00 PM

बॉलिवूड चित्रपटांना कमाईच्या बाबतीत गेल्या काही वर्षापासून साउथ चित्रपटांचा मोठा सामना करावा लागत आहे. हिंदीमध्ये डब झालेल्या साउथ चित्रपटांना टीव्ही वर तर अगोदरपासूनच खूप प्रसिद्धी मिळाली आहे. मात्र बॉक्स आॅफिसवर या चित्रपटांची बक्कळ कमाई होणे हे विशेष आहे.

बॉलिवूड चित्रपटांना कमाईच्या बाबतीत गेल्या काही वर्षापासून साउथ चित्रपटांचा मोठा सामना करावा लागत आहे. हिंदीमध्ये डब झालेल्या साउथ चित्रपटांना टीव्ही वर तर अगोदरपासूनच खूप प्रसिद्धी मिळाली आहे. मात्र बॉक्स आॅफिसवर या चित्रपटांची बक्कळ कमाई होणे हे विशेष आहे. अगोदर बॉक्स आॅफिसवर हिंदीमध्ये चालणारे साउथ चित्रपट, बहुतांश रजनीकांत आणि कमल हासनचेच असायचे, मात्र आता नव्या अ‍ॅक्टर्सच्या चित्रपटांनाही हिंदीमध्ये खूपच पसंत केले जाऊ लागले आहे.  आज आपण अशाच काही चित्रपटांविषयी जाणून घेऊया... 

-रवींद्र मोरे 

 

* बाहुबली: द कन्क्लुजन 

‘कटप्पाने बाहुबलीला का मारले..?’ या प्रश्नाने या चित्रपटास एवढे मोठे बनविले की, साउथमध्ये बनलेल्या या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने बॉलिवूड चित्रपटांच्या कमाईचा रेकॉर्डच तोडला. हिंदी मध्ये डब झालेल्या या चित्रपटाने तब्बल ५०० कोटीपेक्षा जास्त कमाई केली. या चित्रपटाचा पहिला भागही खूपच चालला होता. चित्रपटाच्या दुसºया या भागात साउथ सुपरस्टार प्रभास, राणा दगुबत्ती, अनुष्का शेट्टी, तमन्ना आदींनी मुख्य भूमिका साकारली होती. २५० कोटी बजेट असलेल्या या चित्रपटाने आॅलओव्हर सुमारे १८१० कोटीची कमाई केल्याचे समजते. 

 

* 2.0 

२०१० मध्ये रिलीज झालेल्या रजनीकांतच्या ‘रोबोट’ चित्रपटाचा सीक्वल अर्थात ‘2.0’ या चित्रपटात अक्षय कुमार आणि रजनीकांत होते. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननेही बॉक्स आॅफिसवर खूपच धमाल केली. या चित्रपटाद्वारे अक्षय कुमार पहिल्यांदाच आगळ्यावेगळ्या भूमिकेत दिसला होता. त्याची भूमिका आणि वेगळ्या आशयावर आधारित या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने बॉक्स आॅफिसवर सुमारे १८८ कोटी कमाई केली होती.  सोबतच संपूर्ण जगात सर्वाधिक कमाई करणारा सहावा चित्रपटही बनला. 

 

* बाहुबली 

बाहुबली किंवा बाहुबली:द बिगिनिंग हा तेलुगू आणि तमिळ भाषेत बनलेला भारतीय चित्रपट आहे. शोभू यार्लागड्डा व प्रसाद देवीनेणी निर्मित हा चित्रपट बाहुबली चित्रपटशृंखलेचा हा पहिला भाग आहे.एस एस राजमौली दिग्दर्शित या चित्रपटात प्रभास, राणा दगूबत्ती, तमन्ना व अनुष्का शेट्टी प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटात किलीकी या कृत्रिम भाषेचा वापर केला आहे .भारतीय चित्रपटात कृत्रिम भाषेचा वापर पहिल्यांदाच झालेला असून तिची निर्मिती मदन कार्की या लेखकाने केली आहे. चित्रपटाला हिंदी व मल्याळम भाषेतही डब करून प्रदर्शित केले गेले. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननेही सुमारे १२५ कोटी कमाई केली होती.

 

* के. जी. एफ 

कन्नड भाषेचा सर्वाधिक बिग बजेटच्या या चित्रपटास हिंदीमध्येही खूपच दर्शक मिळाले. याच्या हिंदी व्हर्जनने सुमारे ४२ कोटीची कमाई केली आहे. विशेष म्हणजे ‘झिरो’ आणि ‘सिंबा’ सारखे मोठे बॉलिवूड चित्रपट येऊनही या चित्रपटाने बक्कळ कमाई केली. या चित्रपटात यश, रामचंद्र राजू, अनंत नाग आदी कलाकार आहेत. 

 

* रोबोट 

भारताच्या पहिल्या रोबोटची कहाणी दर्शविणारा या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने बॉक्स आॅफिसवर सुमारे २२ कोटी कमाई केली. विशेष म्हणजे हा चित्रपट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच भावला होता. या चित्रपटात रजनीकांत, ऐश्वर्या रॉय आणि डॅनी डेंझोगपा आदी कलाकार होते.

 

* विश्वरूपम

कमल हासनच्या या चित्रपटाने प्रत्येक भाषेत बॉक्स आॅफिसवर खूपच कमाई केली होती. हिंदी भाषेत तर या चित्रपटाने सुमारे १९ कोटीची कमाई केली होती. विश्वरूपम हा इ.स. २०१३ साली प्रदर्शित झालेला तमिळ चित्रपट आहे. कमल हासनने निर्माण केलेला व अभिनय केलेला हा चित्रपट खर्चिक आणि चर्चित आहे. हा चित्रपट हिंदीमध्ये विश्वरूप नावाने ध्वनिमुद्रित करुन प्रदर्शत झाला.

टॅग्स :बाहुबलीकमल हासनरोबोटरजनीकांत