Join us  

एकदा नेसलेली साडी विद्या बालन परत नेसत नाही, मग काय करते ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 11:10 AM

तिच्या कपाटात तुम्हाला विविध प्रांतातल्या साड्यांचे कलेक्शन पाहायला मिळेल. कॉटन साडी, सिल्क, कांजीवरम, पैठणी, बनारसी अशा विविध प्रकारच्या विविध प्रांतातल्या साड्या परिधान करायला तिला आवडतात. 

स्टाइल हा प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू असतो. इतरांना आकर्षित करण्यासाठी स्टाइल प्रभावी ठरते. इतर अभिनेत्रींप्रमाणे विद्यानेही आपली स्टाइल स्टेटमेंट बनवले आहे.  विविध भूमिकांसाठी वेगवेगळ्या स्टाइलमध्ये दिसणारी विद्या रिअल लाइफमध्येही तिच्या स्टाइलने वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या स्टाइलिश लूकमध्ये ती सगळ्यात जास्त साडीलाच पहिली पसंती देते. बघावं तिथे विद्या तुम्हाला फक्त साडीमध्येच पाहायला मिळेल. तिच्या कपाटात तुम्हाला विविध प्रांतातल्या साड्यांचे कलेक्शन पाहायला मिळेल. कॉटन साडी, सिल्क, कांजीवरम, पैठणी, बनारसी अशा विविध प्रकारच्या विविध प्रांतातल्या साड्या परिधान करायला तिला आवडतात. 

वर्षभरात विद्या 300 हून अधिक साडी खरेदी करते. विशेष म्हणजे एकदा नेसलेली साडी विद्या पुन्हा नेसत नाही.  मात्र या साड्या  अशाच टाकून न देता ती नातेवाईकांना आणि नोकर मंडळींना भेट स्वरुपात देते. नातेवाईकही या साड्या बघून खुष होत असल्याचे ती सांगते. तसेच आपल्या स्टाइलबाबत विद्याने लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,  मी फॅशनची फॅन नाही. अमुकएक फॅशन मी कधीच फॉलो केलेली नाही. जी गोष्ट मला भावते, जी आवडते, तीच माझ्यासाठी माझी स्टाईल असते. अशाच प्रकारे प्रत्येकाने आपली स्टाईल फॉलो करावी. माझ्या फॅशनमध्ये साडीला विशेष महत्त्व आहे. 

कोणत्याही प्रकारची फॅशन ट्रेडिंग असेल आणि ती फॅशन मलाही आवडली असेल. मात्र जर मी त्यात कम्फर्टेबल नसेन तर मी तो ड्रेस घालणार नाही. ट्रेंड आणि फॅशनचा विचार न करता मला जे आवडेल तेच मी परिधान करेल. उगाच फॅशन आणि ट्रेंडच्या मागे धावण्यापेक्षा काही तरी स्वतःचे हटके स्टाईल करा आणि तुमची तीच स्टाईल एक फॅशन बनेल यातच खरी मजा आहे असे मला वाटते. 

टॅग्स :विद्या बालन