Join us  

धनुषचे IMDb वरील सर्वाधिक रेटिंग असलेले हे आहेत टॉप ११ चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 5:46 PM

Actor Dhanush : वेंकटेश प्रभू कस्तूरी राजा अर्थात धनुष ४० वर्षांचा झाला आहे.

वेंकटेश प्रभू कस्तूरी राजा अर्थात धनुष (Dhanush) ४० वर्षांचा झाला आहे. तमीळ आणि हिंदी सिनेसृष्टीतील त्याच्या वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी तो प्रसिद्ध आहे व त्याने कलाकार म्हणूनच नाही तर निर्माता, गीतकार आणि पार्श्वगायक म्हणून सुद्धा काम केलेले आहे. जवळ जवळ २० वर्षांपूर्वी २००२ मध्ये धनुषने पडद्यावर पदार्पण केले होते आणि तरुणांचे नाट्य असलेल्या थुल्लुवाधो इलामाईमध्ये भुमिका केली होती व याचे लेखन आणि दिग्दर्शन त्याचे बंधू के. सेल्वराघवन. यांनी केले होते. त्यानंतर या अभिनेत्याने बॉक्स ऑफीसवर यशस्वी झालेल्या अनेक आघाडीच्या भूमिका पार पाडल्या. ज्यामध्ये पुधु पेताई, थिरूविलेयादल आरंबम, काधाल कोंडेन, असुरन, आणि आदुकलम यांचा समावेश आहे. आदुकलम आणि असुरनमधील त्याच्या भूमिकेमुळे त्याला अनुक्रमे ५८ व्या ६७व्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्तम अभिनेता हा पुरस्कार मिळाला. अभिनेत्याने आनंद एल. राय दिग्दर्शित रांझना चित्रपटाद्वारे हिंदी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाच्या सीक्वेलची घोषणा यावर्षी सुरूवातीला केली गेली आहे. 

IMDb नुसार धनुषच्या सर्वाधिक रेटिंग असलेल्या टॉप ११ मूव्हीज अशा आहेत:

1)    पुधु पेताई - 8.52)    असुरन - 8.4 3)    वादा चेन्नै - 8.44)    आदुकलम - 8.15)    कर्नन - 86)    कधाल कोंडेन - 87)    थिरूचित्रबालम - 7.98)    वेलैयिल्ला पात्थारी - 7.89)    पोल्लाधावेन - 7.710)    मयक्कम एन्ना - 7.711)    रांझना - 7.6

धनुषला अभिनेता नाही तर मरीन इंजिनिअर व्हायचं होतं. पण त्याच्या वडिलांनी त्याच्या सिनेमात अभिनय करण्यावर जोर दिला आणि धनुष मरीन इंजिनिअरच्या जागी अभिनेता झाला. त्याने त्याच्या करिअरची सुरूवात 'तुलुवडो इल्लमई' सिनेमातून केली होती. या सिनेमाचं दिग्दर्शन धनुषने केलं होतं. हा सिनेमा २००२ मध्ये रिलीज झाला होता. यात धनुषने पहिल्यांदाच कॅमेराचा सामना केला होता. त्यानंतर त्याने अडुकलम चित्रपटात काम केले होते आणि या चित्रपटातून त्याला चांगली ओळख मिळाली. या चित्रपटासाठी त्याला बेस्ट अॅक्टरचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

टॅग्स :धनुष