Join us

नमस्ते इंग्लंडमधून अक्षय कुमार आऊट ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2017 14:51 IST

अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ यांच्या जोडीला नमस्ते लंडन या चित्रपटात प्रेक्षकांनी चांगलेच पसंत केले होते. या चित्रपटाचा सीक्वल ...

अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ यांच्या जोडीला नमस्ते लंडन या चित्रपटात प्रेक्षकांनी चांगलेच पसंत केले होते. या चित्रपटाचा सीक्वल ही नमस्ते इंग्लंड येतो आहे. मात्र यात अक्षयच्या जागी अर्जुन कपूरची वर्णी लागली आहे.    फिल्म मेकर विपुल शाहने नमस्ते लंडनचा सीक्वल नमस्ते इंग्लंड घेऊन येणार असल्याचे खूप आधीच सांगितले होते ज्यावेळी अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफच्या जोडीला प्रेक्षक पसंत करत होते.  सीक्वलमध्ये अक्षय कुमारला घेणार असल्याचे जवळपास ठरले होते. मात्र आता अशी चर्चा सुरु झाली आहे नमस्ते इंग्लंडमध्ये अर्जुन कपूरची एंट्री झाली आहे. एक वेबसाईटच्या माहितीनुसार अक्षय ने नमस्ते इंग्लंडची शूटिंग 4 महिने पुढे ढकलली आहे. सध्या अक्षय रजनीकांत यांच्यासोबत 2.0 चित्रपटाच्या कामात बिझी आहे. असे पण बोलले जाते आहे अक्षयने नमस्ते इंग्लंड हा चित्रपट स्वत:हुन सोडून दिला आहे. त्याच्या बिझी शेड्युलमुळे त्याच्याकडे शूटिंगसाठी तारखा नाही आहेत. अक्षय सध्या सीरियस चित्रपटांवर फोकस करतोय त्याला मसाला चित्रपटांमध्ये काम करायचे नाही असे समजते आहे. यात अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी परिणीती चोप्राला अप्रोच करण्यात आले आहे.  अक्षय कुमार सध्या लंडनमध्ये गोल्ड या चित्रपटाचे शूटिंग करतोय. हा चित्रपट भारतीय हॉकी संघावर आधारित आहे. या चित्रपटात अक्षय हॉकी कोच बलबीर सिंग यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच लवकरच त्याचा स्वच्छता भारत अभियानावर आधारित टॉयलेट: एक प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात त्याच्यासोबत भूमि पेडणेकर ही दिसणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरचे सर्वत्र कौतुक झाले आहे.