Join us  

'थलायवीच्या' शूटिंग दरम्यानचे कंगनाचा लूक तुम्ही पाहिला का, या पेहरावात दिसते अधिक सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2020 4:03 PM

Thalaivi Movie : 'थलायवी' सिनेमात 1965 पासून ते 1973 पर्यंत जयललिता यांच्यासोबत एमजीआर यांनी सुमारे 28 चित्रपटांमध्ये काम केले होते.

बॉलीवुडची क्वीन म्हणजे कंगना राणौत जे काही करते ते खासच असते म्हणूनच बॉलिवूडची क्वीन म्हणूनही आता तिला एक वेगळीच ओळख मिळाली आहे. विविध सिनेमातून तिने आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर छाप पाडली आहे. त्यामुळे ती अभिनय करत असलेल्या प्रत्येक सिनेमाशी संबंधित गोष्टींची चर्चा तितकीच रंगत असल्याचे पाहायला मिळते. कंगणाचा आगामी सिनेमा  'थलायवी' चे शूटिंग सध्या चेन्नईमध्ये सुरु आहेत. याच सिनेमातील भरतनाट्य सीक्वेंस शूट केला जात होता. याच सीक्वेंसमधून कंगनाचा लूक समोर आला आहे. ज्यामध्ये ती भरतनाट्यमच्या स्टेप करताना दिसत आहे. या सिनेमासाठी कंगनानेही खूप मेहनत घेतली आहे. या सिनेमासाठी ती भरतनाट्यम आणि तमिळ भाषा सुद्धा शिकली आहे. विशेष म्हणजे जयललिता यांच्या बायोपिकसाठी कंगनाने 20 कोटी रुपयांचे मानधन घेतल्याची चर्चा आहे.

 

प्रसिद्ध दिग्दर्शक विजय या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. सिनेमा जयललिता यांच्यावर आधारित असल्यामुळे वेगवेगळ्या टप्प्यांवरील जयललिता यांच्या लूकशी साधर्म्य साधणारा मेकअपही कंगणाने केला आहे. सिनेमात 1965 पासून ते 1973 पर्यंत जयललिता यांच्यासोबत एमजीआर यांनी सुमारे 28 चित्रपटांमध्ये काम केले होते. जयललिता यांचा एमजीआर यांच्यासोबतचा पहिला चित्रपट 'आइराथिल ओरुवन' होता. जो 1965 मध्ये आला होता. त्यांना राजकारणात आणण्यातही एमजीआर यांची महत्वाची भूमिका होती. चित्रपटात हा रोल अरविंद स्वामी साकारत आहेत.या सिनेमाची घोषणा झाली अगदी तेव्हा पासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  हा सिनेमा 26 जूनला रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :कंगना राणौतथलायवी