Join us

Aamir Khanच्या बहिणीला पाहिलंत का?, ती देखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 16:12 IST

Nikhat Khan : अभिनेता आमिर खान(Aamir Khan)ने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर छाप पाडली आहे. आमिर खानचा भाऊ फैसल खान(Faisal Khan)ही त्याच्यासोबत ‘मेला’ सारख्या चित्रपटात काम करताना दिसला आहे. दोघे भाऊच सिनेइंडस्ट्रीत कार्यरत नाहीत तर त्यांची मोठी बहीण निखत खानही प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान(Aamir Khan)ने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर छाप पाडली आहे. आमिर खानचा भाऊ फैसल खान(Faisal Khan)ही त्याच्यासोबत ‘मेला’ सारख्या चित्रपटात काम करताना दिसला आहे. दोघे भाऊच सिनेइंडस्ट्रीत कार्यरत नाहीत तर त्यांची मोठी बहीण निखत खान(Nikhat Khan) ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे.  दरम्यान आता ती छोट्या पडद्यावर काम करताना दिसणार आहे. 

आमिर खानची बहीण निखत खान टीव्हीवरील एका नव्या मालिकेत एन्ट्री करणार आहे. मात्र, याआधीही ती स्क्रीनवर दिसली असून तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. स्टार प्लसच्या नवीन शो 'दिवानियात'मध्ये निखत एका खास भूमिकेत दिसणार असल्याचे वृत्त आहे. निखत व्यतिरिक्त, मालिकेत विजयेंद्र कुमेरिया, नवनीत मलिक आणि कृतिका सिंग यादव देखील आहेत. 'दिवानियात'मध्ये निखतची उपस्थिती प्रेक्षकांसाठी नक्कीच सरप्राईज असेल. चाहते या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत.

या सिनेमात निखतने केलंय कामनिखत खान दीर्घकाळापासून सिनेइंडस्ट्रीशी संबंधित आहेत निर्माती म्हणून ती 'दुल्हा बिकता है', 'तुम मेरे हो', 'हम हैं राही प्यार के', 'मदहोश', 'लगान' यांसारख्या चित्रपटांशी जोडली गेली आहे. मात्र, अभिनयाबद्दल बोलायचे झाले तर त्याने २०१९ मध्ये 'मिशन मंगल' या चित्रपटातून एंट्री केली आहे. निखतने 'स्पेशल ऑप्स १.५' आणि 'पठाण' सारख्या चित्रपटात काम केले आहे. या सर्वांशिवाय तिने ॲक्सिस बँक, ॲमेझॉन, विप्रो, पेटीएम, हल्दीराम अशा अनेक ब्रँडसाठी मॉडेलिंगही केले आहे.

'दीवानियात' लवकरच स्टार प्लसवरनिखत खान 'दीवानीयात' या मालिकेसाठी खूप उत्सुक आहे. ती आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. कॉकरो आणि शाइका एंटरटेनमेंट निर्मित 'दीवानीयात' लवकरच स्टार प्लसवर प्रसारित होणार आहे. 

टॅग्स :आमिर खान