‘बाहुबली’च्या साम्राज्यावर पडणार हातोडा; बातमी वाचून चाहत्यांना बसणार धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 16:40 IST
हैदराबाद येथील रामोजी फिल्मसिटीमध्ये उभारण्यात आलेल्या दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’ या ऐतिहासिक चित्रपटाचा भव्य सेट लवकरच तोडण्यात ...
‘बाहुबली’च्या साम्राज्यावर पडणार हातोडा; बातमी वाचून चाहत्यांना बसणार धक्का!
हैदराबाद येथील रामोजी फिल्मसिटीमध्ये उभारण्यात आलेल्या दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’ या ऐतिहासिक चित्रपटाचा भव्य सेट लवकरच तोडण्यात येणार आहे. फिल्मसिटीतील एका गाइडने एका लिडिंग वेबसाइटला माहिती देताना सांगितले की, ‘बाहुबली’च्या प्रचंड यशानंतर फिल्मसिटीच्या टीमने बाहुबलीच्या निर्मात्यांकडून हा सेट पाच कोटी रुपयांमध्ये खरेदी केला होता. तेव्हापासून हा सेट लोकांना बघण्यासाठी खुला केला होता. विशेष म्हणजे या सेटला व्हिजिट देणाºया लोकांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने, तिकीट विक्री मोठ्या प्रमाणात व्हायची. एकूणच फिल्मसिटीने या सेटवर जेवढा खर्च केला, तेवढा खर्च त्यांना अल्पकाळातच परत मिळाल्याने फिल्मसिटीचे कुठलेही नुकसान झाले नाही. दरम्यान, आता हा सेट तोडला जाणार असल्याने बाहुबलीच्या चाहत्यांसाठी ही खूप मोठी वाईट बातमी म्हणावी लागेल. हा सेट का तोडला जात आहे? असा प्रश्न जेव्हा गाइडला विचारण्यात आला तेव्हा त्याने सांगितले की, ‘फिल्मसिटीमध्ये अन्य एका चित्रपटाचा सेट उभारायचा आहे. हा सेट ‘बाहुबली’चा सेट असलेल्या ठिकाणीच उभारला जाणार असल्याने, ‘बाहुबली’चा सेट तोडावा लागणार आहे. या नव्या सेटच्या उभारणीला लवकरच सुरुवात केली जाणार असल्याने जानेवारी महिन्यात ‘बाहुबली’चा सेट तोडण्याच्या कामाला सुरुवात केली जाईल. दरम्यान, रामोजी फिल्मसिटीचा एकूण परिसर दोन हजार एकर एवढा आहे. यातील पंधरा एकर परिसरात ‘बाहुबली’चा भव्य सेट उभारण्यात आला आहे. या सेटची निर्मिती प्रॉडक्शन डिझायनर साबू सायरिल यांनी केली आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात माहिष्मती किंग्डमचा सेट उभारण्यासाठी तब्बल २८ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. तर दुसºया भागासाठी याच सेटवर काही नवे एलीमेंट्स जोडून चित्रपटाचे सीन चित्रित करण्यात आले होते. याव्यतिरिक्त एका नव्या किंग्डमचा सेटही तयार करण्यात आला होता. ज्याचा प्रॉडक्शन डिझाइन खर्च सुमारे ३५ कोटी एवढा होता. या सेटसाठी तब्बल ५०० लोकांनी श्रम घेतले. हा सेट ५० दिवसांत उभारण्यात आला होता. आता हा सेट तोडला जाणार असल्याने त्याच्या आठवणीच केवळ भविष्यात जागविल्या जातील. दरम्यान, ‘बाहुबली’च्या दोन्ही भागांनी बॉक्स आॅफिसवर कमाईचे अनेक विक्रम केले. बॉलिवूडमधील जवळपास सर्वच रेकॉर्ड चित्रपटाने आपल्या नावे केल्याने या चित्रपटाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. चित्रपटातील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या मनात असून, देशातील काही भागांमधील चित्रपटगृहांमध्ये आजही या चित्रपटाचे शो चालत आहेत.