Join us  

संस्कृतीची वाट लावणार्‍या बॉलिवूडविरोधात केस होऊ शकेल का? विवेक अग्निहोत्रींचा ‘सवाल’, निखील द्विवेदीचा मजेशीर ‘जबाव’

By रूपाली मुधोळकर | Published: October 13, 2020 2:15 PM

पत्रकारांविरोधात कोर्टात जाणार्‍या बॉलिवूडकरांवर विवेक अग्निहोत्रीने थेट निशाणा साधला...

ठळक मुद्देबेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह ३८ जणांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.

बेजबाबदार वृत्तांकन करणार्‍या दोन न्यूज चॅनल्सविरोधात शाहरूख खान, सलमान खान, आमिर खान, अजय देवगण, करण जोहर  या बॉलिवूडच्या काही दिग्गज स्टार्ससोबत 38 निर्मात्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावत दाद मागितली. अपेक्षेनुसार, पडसाद सोशल मीडियावर या बातमी पडसाद उमटलेत. यादरम्यान बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने असे काही ट्विट केले की, सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. होय, पत्रकारांविरोधात कोर्टात जाणार्‍या बॉलिवूडकरांवर विवेक अग्निहोत्रीने थेट निशाणा साधला. विशेष म्हणजे, त्याच्या या ट्विटला अभिनेता व निर्माता निखील द्विवेदीने असे काही मजेशीर उत्तर दिले की, सगळेच हैराण झालेत.

देशाची जनता बॉलिवूडवर केस करू शकेल का?

भारताचे संगीत, भाषा, कला, रचनात्मकता आणि भारतीय संस्कृतीची वाट लावल्याबद्दल देशाची जनता बॉलिवूडवर खटला दाखल करू शकेल काय? असे ट्विट विवेक अग्निहोत्रीने केले. त्यांच्या या ट्विटवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. पण निखील द्विवेदीने यावर जे काही उत्तर दिले त्याची चर्चा अधिक झाली.

शांत हो...

निखील द्विवेदीने विवेक अग्निहोत्रीच्या ट्विटला कोट करत उत्तर दिले. ‘सर, तुम्ही आणि मी मिळून हेट स्टोरी बनवला होता. खूप ट्रोल होऊ आपण. शांत हो,’ असे उत्तर निखीलने दिले. निखीलचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.2015 साली रिलीज झालेला ‘हेट स्टोरी’ हा सिनेमा विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केला होता आणि यात निखील द्विवेदीने विकीची भूमिका साकारली होती. हा सिनेमा दणकून आपटला होता.

दोन चॅनल्सविरोधात ‘बॉलीवूड’ कोर्टात

बॉलीवूडमधील लोक अमली पदार्थांचे व्यसनी तसेच मलीन प्रतिमेचे आहेत, असा उल्लेख टाइम्स नाऊ, रिपब्लिक टीव्हीने सुशांतसिंह राजपूत प्रकरणी करून बेजबाबदार पद्धतीने वृत्तांकन केले, अशा तक्रारी करणारी याचिका आमीर खान, शाहरूख खान, सलमान खान, अजय देवगण आदी दिग्गज कलाकार व निर्माते, चित्रपट क्षेत्रातील विविध संघटनांनी केला आहे. दिल्ली उच्च न्यायालयात याचिका केली आहे.

‘’बॉलिवूड ड्रग्स, नेपोटिझम आणि शोषणाचे गटार,’’ कंगना राणौतचा पुन्हा एकदा वार

या प्रकरणात दाद मागणाऱ्यांमध्ये करण जोहर, आदित्य चोप्रा, फरहान अख्तर आदी नामवंतांचाही समावेश आहे. रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी तसेच टाइम्स नाऊचे राहुल शिवशंकर, नविकाकुमार यांच्या विरोधात न्यायालयात या कलाकारांनी दाद मागितली आहे. या वृत्तवाहिन्यांनी बॉलीवूडसाठी ओंगळ, व्यसनी अशा अपशब्दांचा वापर चालविलेला आहे, असा आरोप या याचिकेत आहे. बॉलीवूडमध्ये घाण असून ती साफ करण्याची गरज आहे, अशी प्रक्षोभक भाषा या वृत्तवाहिन्यांनी वापरल्याचा आरोप केला आहे. सुशांतप्रकरणी माध्यमांनी कायद्याचा भंग होईल, असे वृत्तांकन करू नये, असा आदेश द्यावा, अशी विनंती केलीे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतबॉलिवूड