Join us

​ हर्षवर्धनच्या डोक्यात ‘मिर्झिया’ची हवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2016 18:08 IST

अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर याचा ‘मिर्झिया’ रिलीज व्हायला अद्याप अवकाश आहे. पण रिलीजपूर्वीच हर्षवर्धन यशाने जणू हुरळून गेला ...

अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर याचा ‘मिर्झिया’ रिलीज व्हायला अद्याप अवकाश आहे. पण रिलीजपूर्वीच हर्षवर्धन यशाने जणू हुरळून गेला आहे. चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच डोक्यात प्रसिद्धीची हवा गेल्यासारखा तो वागू लागला आहे. होय, अलीकडे झालेल्या पत्रपरिषदेत त्याचा प्रत्यय आला. ‘मिर्झिया’चे दिग्दर्शक  राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक पत्रपरिषद आयोजित केली होती. हर्षवर्धन याठिकाणी येणार होता. पण तो अर्ध्या तास उशीरा पत्रपरिषदेत पोहोचला. तसेही उशीरा पोहोचणे ही सेलिब्रिटींची जुनी सवय. त्यामुळे हर्षवर्धन उशीरा पोहोचल्याचे कुणीही मनावर घेतले नाही. पण यानंतर हर्षवर्धनने जे केले ते पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या. हर्षवर्धन आला आणि थेट त्याच्या खुर्चीवर जावून बसला. आता तुम्ही म्हणाल त्यात काय चुकले. तर चुकलेच. हर्षवर्धन खुर्चीवर बसला आणि त्याने पाय थेट समोरच्या टेबलावर ठेवले. त्याचे जोडे समोर बसलेल्या पत्रकारांच्या तोंडासमोर होते. त्याचे हे वागणे बघून प्रत्येकालाच आश्चर्य वाटले. मग काय, कुणीतरी मागून येऊन हर्षवर्धनला टेबलावरून पाय खाली घ्यायला सांगितले. तेव्हा कुठे त्याने पाय खाली घेतले. यापूर्वीही हर्षवर्धन मीडिया फोटोग्राफर्ससोबत गैरवर्तन करून चुकला आहे. एकंदर काय, तर स्टारडम मिळण्याआधीच हर्षवर्धनच्या डोक्यात हवा गेलेली दिसते आहे. पप्पा अनिल कपूर आणि बहीण सोनम कपूरकडून त्याने काही शिष्टाचार शिकावा, इतकीच अपेक्षा आहे.