Join us

Corona Virus : हार्दिक-नताशाचा वर्कआऊट सेल्फी व्हायरल; एन्जॉय करत आहेत फन टाइम!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 17:38 IST

नुकताच हार्दिक पांड्याने त्याची गर्लफ्रेंड नताशा स्टॅनकोव्हिक हिच्यासोबतचा एक सेल्फी पोस्ट केला आहे. त्यात त्यांच्यासोबत हार्दिकचा भाऊही दिसत आहे.

सध्या कोरोनाने सर्वत्र थैमान घातले असून सर्वसामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटीही होम क्वारंटाइन झाले आहेत. आता सेलिब्रिटीही घरची कामं, वर्कआऊट, हॉबी, फॅमिलीसोबत वेळ घालवताना दिसत आहेत. ते त्यांचे वर्कआऊट व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असून नुकताच हार्दिक पांड्याने त्याची गर्लफ्रेंड नताशा स्टॅनकोव्हिक हिच्यासोबतचा एक सेल्फी पोस्ट केला आहे. त्यात त्यांच्यासोबत हार्दिकचा भाऊही दिसत आहे. त्यांनी एन्जॉय केलेला फन टाइम तुम्हाला बघायचाय? मग पहा हा सेल्फी...

भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक सेल्फी शेअर केला आहे. ज्यात त्याचा भाऊ कुणाल पांड्या आणि त्याची पत्नी पंखुरी शर्मा देखील वर्कआऊट करताना दिसत आहेत. ते एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसत आहेत. कोरोना व्हायरसमुळे जीम बंद आहेत. पण, आता घरालाच त्यांना जीम बनवावे लागले, असे दिसतेय. या फोटोला त्याने कॅप्शन दिले आहे, ‘एक सुंदर वर्कआऊट सेशन माझ्या जिवलगांसोबत...’ 

हार्दिक आणि नताशा यांनी जानेवारीतच दुबईत साखरपुडा केला आहे. तेव्हापासून ते त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या रोमँटिक फोटोंनी संपर्कात असतात. नताशा ही एक सेर्बिअन मॉडेल असून ती फुकरे रिटर्न्स आणि सत्याग्रह या चित्रपटांमधून प्रेक्षकांसमोर आली होती. 

टॅग्स :हार्दिक पांड्यानताशा स्टँकोव्हिचकोरोना वायरस बातम्या