Join us  

हार्दिक पांड्या मुलगा अगस्त्यसोबत निघाला फेरफटका मारायला, पत्नी नताशा स्टेन्कोविकने शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 2:35 PM

हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टेन्कोविक आपल्या ग्लॅमरस लूक आणि व्हिडीओमुळे नेहमी चर्चेत येत असते.

बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टेन्कोविक आपल्या ग्लॅमरस लूक आणि व्हिडीओमुळे नेहमी चर्चेत येत असते. इतकेच नाही तर ती मुलगा अगस्त्यसोबत खेळताना व डान्स करतानाचा व्हिडीओदेखील शेअर करत असते. नताशा स्टेन्कोविकने सोशल मीडियावर नुकताच शेअर केलेला व्हिडीओ खूप व्हायरल होतो आहे.

नुकतेच नताशाने इंस्टाग्राम स्टोरीवर नवरा हार्दिक पांड्या आणि मुलगा अगस्त्यचा क्यूट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत हार्दिक त्याचा मुलगा अगस्त्यला बाहेर फिरवताना दिसतो आहे.

हार्दिक पांड्या आणि त्याचा मुलगा अगस्त्यचा हा क्युट व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओला खूप पसंती मिळते आहे. या व्हिडीओत अगस्त्य बेबी स्ट्रोलरमध्ये बसलेला दिसतो आहे आणि त्याला वडील म्हणजेच हार्दिक पांड्या फिरवताना दिसतो आहे.

हार्दिक पांड्याने १ जानेवारी २०२० रोजी नताशासह साखरपुडा केला होता. कोरोनाच्या संकटामुळे देश लॉकडाऊनमध्ये असताना हार्दिक आणि नताशाने देशवासियांना आपल्या पहिल्या मुलाच्या आगमनाची बातमी दिली होती.

३१ मे रोजी नताशाने आपण गर्भवती असल्याची बातमी सोशल मीडियावर देत आपला आनंद चाहत्यांसह शेअर केला होता. त्यानंतर हार्दिक पाड्या नताशाच्या प्रेग्नन्सीची प्रत्येक अपडेट सातत्याने सोशल मीडियावर शेअर करायचे. ३० जुलैला नताशाने बाळाला जन्म दिला होता.

टॅग्स :हार्दिक पांड्यानताशा स्टँकोव्हिच