प्रेम रतन वर शुभेच्छांचा वर्षाव - सोनम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 10:55 IST
अभिनेत्री सोनम कपूर तिचा चित्रपट 'प्रेम रतन धन पायो' च्या कलेक्शनविषयी अत्यंत उत्सुक आहे. चित्रपटाचे क लेक्शन किती होत ...
प्रेम रतन वर शुभेच्छांचा वर्षाव - सोनम
अभिनेत्री सोनम कपूर तिचा चित्रपट 'प्रेम रतन धन पायो' च्या कलेक्शनविषयी अत्यंत उत्सुक आहे. चित्रपटाचे क लेक्शन किती होत आहे याविषयी तिलाही उत्सुकता आहे. ती म्हणते,'मला नंबर्स कळत नाहीत. पण मला निर्मात्यांकडून फोन येतो. संदेश मिळतो की एवढे कलेक्शन झाले आहे. ती म्हणते, की एवढे कलेक्शन चांगले आहे की वाईट? बिझनेस मला कळत नाही. तेव्हा निर्माते म्हणतात,' खरंतर गुडन्युजच आहे. खुप लोक चित्रपट पाहत आहेत. तसेच शीर्षक गीतावरील सोनमचा डान्स तर सर्वांच्या खुपच पसंतीस उतरत आहे. शीर्षक गीतावर रिचा चढ्ढा, मुन्नी, आणि दिलवालेची टीम डान्स करत आहे. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. अत्यंत आनंदीत होऊन ती म्हणते,' सर्वजण मला अभिनंदन करत आहेत. मला फोन, मेसेज करून शुभेच्छा देत आहेत. ज्यांचे मला अपेक्षित नाहीत अशा लोकांचे मला फोन येत आहेत.